'फुगे' तली ग्लॅमरस कामिनी

स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे ह्या मराठी सिनेइंडस्ट्रीच्या 'एस' फॅक्टर्सना एकत्र आणणाऱ्या 'फुगे' या आगामी सिनेमातून नीता शेट्टी ही ग्लॅमरस अभिनेत्री प्रेक्षकांसमोर येणार आहे. हिंदीचा छोटा पडदा गाजवणारी ही बोल्ड अभिनेत्री 'फुगे' या सिनेमाच्या माध्यमातून प्रथमच मराठीत पदार्पण करत आहे. यात ती आपल्याला एका वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळणार असून, सुबोध भावेच्या प्रेयसीच्या भूमिकेत ती झळकणार आहे. 
स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित 'फुगे' या सिनेमात ती कामिनी नावाची व्यक्तिरेखा साकारत असून, ही कामिनी बिन्धास्त, चुलबुली आणि आधुनिक विचारांची आहे. या सिनेमात नीता टॅटू आर्टिस्टची भूमिका करत असल्यामुळे, 'फुगे' मधील तिचे व्यक्तिमत्व देखील तसेच रंजक आणि कलाप्रिय असे दाखवण्यात आले आहे. विशेष म्हणजे, खऱ्या आयुष्यातदेखील नीता अगदी तशीच असल्यामुळे कॅमेऱ्यामधील ही कामिनी नेमकी काय धम्माल करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. यात प्रार्थना बेहेरे, आनंद इंगळे, मोहन जोशी आणि सुहास जोशी यांची देखील प्रमुख भूमिका आहे. 
इंदर राज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. 
'फुगे' तली ग्लॅमरस कामिनी (Neetha Shetty) https://www.facebook.com/FugayTheFilm/videos/1842791539337398/ 

Subscribe to receive free email updates: