राम आणि शाम हे दोन्ही अट्टल खुनी दरोडेखोर वर्षोनवर्षे रायगड पट्ट्यात अनेकांचे मुडदे पाडत दहशत पसरवली होती. धनाढ्यच नाही तर गरीब आदिवासीना सुद्धा ते धमकावयचे. खंडणीसाठी ते कोणाही ठार मारायचे मग बाई पुरुष हे काहीही बघायचे नाहीत. त्यांचा एवढा दरारा झाला होता कि पोलिसवाले सुद्धा घाबरत होते. सुरेश खोपडे यांची रायगड जिल्ह्यात उपविभागिय पोलीस अधिकारी म्हणून नेमणूक झाली आणि आपल्या पहिल्याच पोस्टिंगमध्ये सुरेश खोपडे यांनी केस निकाली काढली. पण त्यांचा हा लढा एवढा सोपा नव्हता. महिनोंमहिने आदिवाशींच्या मदतीने पाठ काढत, व्यवस्थित जाळं रचून त्यांचा ठावठिकाणा शोधून काढला आणि नंतर अतिशय निर्भयपणे त्यांनी राम आणि शाम या जोडगोळीला कसे कंठस्थान घातले याची चित्तरकथा शुक्रवारी रात्री ९ च्या या भागात आपल्याला झी युवावर पाहायला मिळेल.
दुसऱ्या कथेत आपल्याला पोलीस अधिकारी भोसले यांनी मुंबईमधील प्रसिद्ध व्यवसायिक दवे यांचा मुलगा किरण दवे अपहरण केस कशी जिद्दीने सोडवली हे समजेल. किरण दवे अपहरण केस पोलिसांसाठी एक `प्रतिष्ठेची केस बनलेली होती. आधीच बिल्डर लॉबी वेगवेगळ्या गँग्स कडून येणाऱ्या धमक्यांमुळे हैराण होती आणि दवेंच्या मुलाला किडनॅप होऊन बराच काळ लोटला होता पण किडनॅपर पोलिसांच्या हातातून सारखेच निसटत होते. शेवटी किडनॅपरची मागणी मान्य करून दवे यांनी त्याच्या मुलाला सोडवले पण त्यामुळे पोलिसांच्या अब्रूची लक्तरे निघाली. एका कर्तव्यनिष्ठ इमानदार पोलीस अधिकाऱ्याच्या अक्कल हुशारी आणि मुख्य म्हणजे त्याच्या शौर्याचे प्रतीक म्हणजेच हि कथा आहे. कश्याप्रकारे भोसले एका छोट्याशा पुराव्यावर अपहरणकर्त्या पर्यंत पोहोचले आणि पोलिसांच्या गौरवाची शान राखली हे आपल्याला शनिवारच्या ९ च्या या भागात आपल्याला पहायला मिळेल.
या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तरलेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणिसंगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.