आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून काही साईभक्तांनी काही वर्षांपूर्वी मुंबई ते शिर्डी पदयात्रा सुरू केली. साईबाबांची पालखी घेऊन या मंडळांतील हजारो भक्त श्री रामनवमीच्या उत्सवासाठी दरवर्षी शिर्डीला जातात. या मंडळाचे नाव आहे... साईसेवक मंडळ. १९८१ साली स्थापन झालेल्या आणि सर्वप्रथम पदयात्रा सुरु करणाऱ्या या साईसेवक मंडळातील साईभक्तांचा आकडा आता आठ ते साडेआठ हजारांवर गेला आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साईसेवक मंडळच्या साईपालखी भव्य पदयात्रेचा शुभारंभ आज (शनिवार २५ मार्च) झाला.
दादर परिसरातून या पालखी पदयात्रेला सुरुवात झाली. या पदयात्रेतसाईसेवक मंडळाचे हजारो कार्यकर्ते व साईभक्त सहभागी झाले होते. साईभक्तांनी प्रत्येक चौकात रांगोळी काढून व पुष्पवृष्टी करून या पालखीचे स्वागत केले. अनेक मान्यवर मंडळी या पदयात्रेसाठी उपस्थित होती.