हर्बेरियमच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा ‘पती गेले गं काठेवाडी’ या नाटकाने प्रारंभ

'सुबकया संस्थेद्वारे 'हर्बेरियम' हा नावीन्यपूर्ण उपक्रम सुनील बर्वे यांनी पाच वर्षापूर्वी हाती घेतला. मराठी रंगभूमीवर 'मैलाचा दगडठरलेली आणि गाजलेली काही चांगली नाटके 'हर्बेरियम' या उपक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना पुन्हा अनुभवता आली. आजच्या तरुण पिढीला या नाटकांची माहिती व्हावी आणि रंगभूमीवर गाजलेली नाटके पुन्हा पहाता यावीया उद्देशाने सुनील बर्वे यांनी हा उपक्रम राबविला होता. या अभिनव उपक्रमाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. नाटकाच्या प्रयोगाच्या तिकीटांसाठी नाट्यरसिकांनी पहाटे लावलेल्या रांगा या उपक्रमाच्या अभूतपूर्व यशाची कल्पना देतात. सूर्याची पिल्ले’, ‘लहानपण देगा देवा’, ‘हमीदाबाईची कोठी’, ‘आंधळं दळतंय’ आणि झोपी गेलेला जागा झाला’ या पाच नाटकांचाहर्बेरियम उपक्रम २०१२ मध्ये संपल्यानंतर अभिनेते सुनील बर्वे नवीन काय घेऊन येणार याकडे नाट्यरसिकांचे ही डोळे लागले होते. आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर ही उत्सुकता संपणार असून 'हर्बेरियम'च्या दुसऱ्या नव्या पर्वाची पर्वणी प्रेक्षकांना मिळणार आहे.
या दुसऱ्या पर्वाची घोषणा निर्माते सुनील बर्वे यांनी नुकतीच एका पत्रकार परिषदेत केली. बॅकस्टेज आर्टिस्ट मधू दळवी यांच्या फोटोला पुष्पहार घालत ही पत्रकार परिषद सुरु करण्यात आली. माझ्या आजवरच्या यशात प्रेक्षकांच्या प्रेमाचा मोलाचा वाटा आहे. त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच प्रेक्षक विनंतीला मान देत हर्बेरियमच दुसरं पर्व मी आणलं आहे, असं सुनील बर्वे यांनी यावेळी सांगितलं. हर्बेरियम या उपक्रमाच्या पहिल्या पर्वाला लाभलेल्या उत्तम यशानंतर दुसऱ्या पर्वाचे स्वागत ही नाट्यरसिक जोरदार करतील आणि हे पर्वही नाट्यरसिकांना स्मरणरंजनाचा आनंद देईल असा विश्वास सुनील बर्वे यांनी व्यक्त केला. हर्बेरियम चा उपक्रम राबवताना तो अभ्यासपूर्वक राबवायला हवा यासाठी सुनील बर्वे आग्रही होते. त्यासाठी परदेशी जाऊन जागतिक रंगभूमीचा आढावा घेतल्यानंतर आपला दृष्टीकोन बदलला असं सांगत हर्बेरियमच्या उपक्रमात याचा फायदा झाल्याचं सुनील बर्वे आवर्जून सांगतात. चांगल्या उपक्रमात सहभागी होता आल्याचा आनंद दिग्दर्शक विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णीप्रतिमा कुलकर्णीमंगेश कदम,केदार शिंदे व कलाकार मृण्मयी गोडबोलेईशा केसकरललित प्रभाकर,अभिजीत खांडकेकरनिखील रत्नपारखीधनंजय म्हसकर व सिद्धेश जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
हर्बेरियम उपक्रमाअंतर्गत सादर झालेल्या जुन्या नाटकांचे रसिक प्रेक्षकांनी भरभरुन स्वागत केले होते. या पार्श्वभूमीवर हर्बेरियम' पुन्हा एकदा रसिकांना दर्जेदार नाटकांची मेजवानी देणार आहे. ज्येष्ठ साहित्यिक व्यंकटेश माडगुळकर लिखित पती गेले गं काठेवाडी या नाटकाने या नव्या पर्वाची सुरुवात होईल. या नाटकाचं दिग्दर्शन विजय केंकरे करणार आहेत. या पर्वातही पाच नाटकं असून विजय केंकरे यांच्यासह चंद्रकांत कुलकर्णीप्रतिमा कुलकर्णीमंगेश कदमकेदार शिंदे या मातब्बर दिग्दर्शकांची नाटकं या पर्वात सादर होणार आहेत. मुंबई व महाराष्ट्रात या नाटकांचे प्रयोग रंगतील.
पती गेले गं काठेवाडी या नाटकात मृण्मयी गोडबोलेईशा केसकरललित प्रभाकरअभिजीत खांडकेकरनिखील रत्नपारखी या कलावंतांसह धनंजय म्हसकर व सिद्धेश जाधव हे दोन नव्या दमाचे गायक कलावंत भूमिका करणार आहेत. याचे नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचं असून प्रकाश योजना शीतल तळपदे यांची असणार आहे. संगीत राहुल रानडे तर वेशभूषा मंगल केंकरे यांची आहे. शनिवार २३ सप्टेंबरला या नाटकाचा पहिला प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात दुपारी ४.०० वाजता रंगणार आहे.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :