वाढत्या अॅलर्जिक आजारांसाठी तंत्रज्ञानाशी संबंधित उपाय


मुंबई, मार्च 29, 2018: हवामानामध्ये दरवर्षीप्रमाणे बदल होत असल्यानेभारतात अॅलर्जिक आजारांचे प्रमाण व तीव्रता या दोन्हींमध्ये वाढ होत आहे.अॅलर्जिक ऱ्हायनायटिस (ताप या नावाने ओळखला जाणारा आजार) हा जगभर सर्रास आढळणारा अॅलर्जिक आजार असून त्याने अंदाजे 10-25% लोकसंख्येला ग्रासले आहेप्रायमरी केअर फिजिशिअनकडे जावे लागण्याच्या दहा प्रमुख कारणांमध्ये या आजाराचा समावेश आहे. सावधगिरी म्हणूनघरी किंवा कामाच्या ठिकाणी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी एचईपीए तंत्रज्ञानाचा वापर करून ही समस्या कमी करता येऊ शकते. 
याविषयी बोलताना ब्लुएअर इंडियाचे कंट्री हेड अरविंद चाबरा यांनी सांगितले, दिसून न येणारे धोके ओळखणे अतिशय महत्त्वाचे आहे. सूक्ष्मन दिसणारी प्रदूषके श्वासाद्वारे शरीरात गेल्याने धोका निर्माण होतो. खोलीतली हवा नेहमी निरोगी ठेवण्यासाठी एअर प्युरिफायर हा एक प्रभावी उपाय आहे. एचईपीएसायलेंट™ या दर्जेदार तंत्रज्ञानामुळे ब्लुएअर एअर प्युरिफायर श्वसनविषयक आजार व अन्य आजारांना कारणीभूत होणारी हवेतील 99.97% प्रदूषके काढून टाकून खोलीतील हवेवर नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतात.
चाबरा यांनी सांगितले, “कॅस टेस्ट टेक्निकल सर्व्हिसेस या चीनमधील स्वतंत्र, मान्यताप्राप्त टेस्ट इन्स्टिट्यूटने नुकत्याच केलेल्या चाचणीच्या मतेब्लुएअर क्लासिक 280i  205 यांनी 60 मिनिटांनी H1N1 इन्फ्लुएंझा A/PR8/34 आणि स्टॅफीलोकोकस ऑरिअसएशेरिकाय कोली व अस्परगिलस जवळजवळ99.99% नाहीसे केले.”
ग्लोबल हॉस्पिटल्समधील कन्सल्टिंग चेस्ट फिजिशिअन डॉ. समीर गर्दे म्हणाले, प्रदूषणाशी संबंधित अॅलर्जिक आजार टाळण्यासाठी पुरेशी काळजी घेणे हा एक सर्वोत्तम पर्याय आहेहवामानात दरवर्षीसारखे बदल होत असल्याने या अॅलर्जिक आजारांचे रुग्ण आढळण्याचे प्रमाणही वाढले आहे. पार्टिक्युलेट मॅटर (पीएम) आरोग्यासाठी अतिशय घातक असतात व त्यामुळे अनेक प्रकारे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतोअसे गेल्या दशकात असंख्य पाहणींमध्ये आढळले आहे. पार्टिक्युलेट मॅटर 2.5 च्या पातळीमुळे आरोग्यावर गंभीर परिणाम होतातकारण हे कण फुप्फुसामध्ये चिकटतात व ते रक्तप्रवाहामध्ये जाऊ शकतात.”
खोलीतील हवा बाहेरच्या हवेपेक्षा 5 पटीने किंवा त्याहून अधिक प्रदूषित असू शकतेअसे अनेक पाहणींतून आढळले आहे. धुळीव्यतिरिक्त, स्वच्छतेसाठीच्या वस्तूरंग व व्हार्निशस्टेन प्रोटेक्टर्स वापरलेले कारपेट व अपहोलेस्ट्री अशा घरातील दररोजच्या वापरातल्या उत्पादनांमुळे सूक्ष्म कण व वायूही हवेत मिसळू शकतात. याबरोबरच, पोलनवाहनांचे एक्झॉस्ट व औद्योगिक प्रदूषके अशा बाहेरच्या प्रदूषणामुळे खोलीतील हवेची गुणवत्ता घसरते व श्वसनविषयक आजार व अॅलर्जी यांचा धोका वाढतो.

Subscribe to receive free email updates: