दोस्ती बँड सुरांच्या कसोटीला खरा उतरणार का?

रॉकीने वैदेहीला दिलेल्या चॅलेंजनुसार दोघेही पुर्ण तयारीनिशी एकमेकांसमोर उभे राहणार आहेत. मानस वैदेहीचा दोस्ती बँड त्यांच्यासमोर आलेल्या प्रत्येक संकटामधून मार्ग काढत जिंकण्याची पूर्ण तयारी करत आहे. समीरला झालेल्या अपघातानंतरही तो एका हाताने का होईना पण ड्रम वाजवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याची जिद्द पाहून त्याचे सर्व साथीदार त्याला सपोर्ट करतायेत. मानसला त्याच्या बाबांच्या तब्येतीमुळे टेन्शन आलं होतं, ज्यामुळे मानस बँड सोडण्याचा विचार करत होता पण त्याच्या बाबांनीच मानस आणि वैदेहीला निक्षून सांगितलं की, कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला ही कॉम्पिटिशन जिंकायची आहे. त्यामुळे मानस वैदेहीने नव्या जोमाने पुन्हा प्रॅक्टिस सुरु केली आहे. दुसरीकडे माया आणि रॉकी दोस्ती बँडला अजून अडचणीत कसं आणता येईल यासाठी शक्य तेवढे प्रयत्न करत आहेत.
समीरला झालेला अपघात हा माया आणि रॉकीने घडवून आणला होता हे मानस वैदेहीला कळेल का? एकामागे एक येणाऱ्या संकटाना तोंड देत दोस्ती बँड त्यांची तयारी कशी सुरु ठेवेल? अवघ्या काही दिवसांवर आलेली कॉन्सर्ट मानस वैदेही जिंकणार का?
जाणून घेण्यासाठी पाहत राहा "फुलपाखरू" सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता आपल्या लाडक्या झी युवावर

Subscribe to receive free email updates: