वूमन्स रॅली टू वॅलीमध्ये पॅड वूमन, वंडर वूमन, गुलाबी गँग यांनी नोंदवला सहभाग
मुंबई 28 मार्च: जेके टायर वूमन्स रॅली टू वॅलीमध्ये 175 नव्याने रंगवलेल्या गाड्या जवळपास 800 हुन अधिक महिला वापरल्या.या माध्यमातून रविवारी व सोमवारी महिलांच्या शक्तीची पुन्हा एकदा सर्वांना ताकद पहायला मिळाली.
लवासापर्यंतच्या 150 किमी या रॅलीतील प्रवासादरम्यान महिला सशक्तीकरणाचा संदेश देण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला होता. चालकांचे मित्र , कुटुंबातील सदस्य आणि दर्शक सर्वजण रॅलीदरम्यान प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित होते.
सर्वोत्तम थीम पुरस्कार आणि सर्वाधिक पाठिंबा मिळाला तो मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील काम करणाऱ्या सर्व महिलांच्या संघाला. या रेल्वे स्थानकात एकही पुरुष नसून 41 महिलांचा सहभाग आहे.एफआयए वर्ल्ड मोटरस्पोर्ट्स काऊंसील सदस्य गौतम सिंघानिया यांनी रॅलीचे फ्लॅग ऑफ केले तर, जे के टायरचे जनरल मॅनेजर यांनी मंगळवारी रात्री पार पडलेल्या पारितोषिक समारंभाला उपस्थिती लावली होती.
या कार्यक्रमात गुलाबी गँगला सर्वोत्तम सजवलेल्या गाडीसाठी प्रथम पुरस्कार देण्यात आला. पूर्ण कार ही पाखळ्यानी सजविण्यात आली होती. त्यावर डेडिकेटेड एज पेटल्स, हार्ड एस रॉक्स, ईफ यु हर्ट मी वन्स, आय विल हिट यु ट्वाईस असा संदेश लिहीण्यात आला होता.
यामधील महिलांनी गुलाबी चुडीदार घातला होता व हातात गुलाबी काटी होती. गुलाब गँग चित्रपटात माधुरी दीक्षितने असाच पेहराव केला होता व तो लोकप्रिय झाला होता.
वंडर वूमनने ब्राऊन टॉप्स, ब्लु स्कर्ट्स, मास्क व मोठा बेल्ट घातला होता. चित्रपटाप्रमाणे केलेल्या या पेहरावा करता त्यांना सर्वोत्तम ड्रेसज्ड संघाचा पुरस्कार मिळाला. वंडर वूमन इज नॉट ए फिकशनल कॅरेक्टर असा संदेश दिला.
तर, आणखीन एका संघाला त्यांच्या चांगल्या संदेशाकरता सर्वोत्तम उत्साहवर्धक संघ म्हणून पुरस्कार देण्यात आला. लिटील गर्ल्स विथ ड्रीम बिकम वूमन विथ विझन असा तो संदेश होता. काळ्या एक्सयुव्हीने नुकत्याच प्रदर्शित होऊन गेलेल्या अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपटाचा संदेश दिला. त्यांना सर्वोत्तम घोषवाक्य आणि सर्वोत्तम सोशल मीडियाचे लाईक्स मिळालेली कार असे पुरस्कार मिळाले.
हंगामात चमक दाखवणारी दीपा दामोदरन हिला त्याच्या बहीण आणि आईसह (नेव्हीगेटर) चषक आणि एक लाख रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.या रॅलीचे दरवर्षी डब्ल्यूआयएए कडून रस्ते सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्यासाठी आयोजन केले जाते.