मुंबई, २३ जानेवारी, २०१७ : कलर्स मराठीवर चाहूल हि मालिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेमधील जेनी हि अल्पवधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली आहे तर मालिकेमध्ये वापरण्यात आलेली वेगवेगळी कॅमेरा टेकनिक्समुळे प्रेक्षकांना हि मालिका इतर मालिकांपेक्षा वेगळी वाटत आहे. मालिकेच्या कथानकाबद्दल तर उत्कंठा आहेच पण आता एक वेगळीच चाहूल लागली आहे. पण या सगळ्या प्रवासामध्ये आणि हे सगळ होत असताना सर्जेरावांना एक प्रश्न आहे कि त्यांची बालपणाची मैत्रीण निर्मला गेली कुठे? तिचा पत्ता कुठेच लागत नाहीये. त्यावर बबन्याला जे सत्य माहिती आहे सर्जेरावांपर्यंत पोहचेल कि त्याचे प्रश्न निरुत्तरित राहतील ? या सगळ्या प्रश्नांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. पण आता हि उत्सुकता मिटणार आहे, कारण निर्मलाच भवानिपुरमध्ये परतली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना हा ड्रामा बघायला नक्कीच मज्जा येणार आहे यात शंका नाही.
आतापर्यंत खूप अकलनीय घटना घडल्या त्याच कारण आजवर कोणालच कळले नव्हते पण आता त्याचा उलगडा होणार आहे कारण निर्मलाचा आत्मा सर्वांसमोर येणार आहे. तेंव्हा निर्मलाचे हे रूप पहायला विसरू नका “चाहूल” ३० जानेवारीला रात्री १०.३० वा.फक्त कलर्स मराठीवर.