पत्रलेखन हि खाजगी गोष्ट 'चला हवा येऊ द्या' च्या माध्यमातून सर्वांची झाली

मुंबई: २५ डिसेंबर २०१७ वाचकदीनी अरविंद जगताप लिखित 'पत्रास कारण की...' पुस्तकाचा प्रकाशन समारंभास डॉनिलेश साबळेसयाजी शिंदेसंजय जाधव,हेमलता अंतरकररमेश भाटकरगणपतराव जगतापसुदेश हिंगलासपूरकरकिरण येले मान्यवर मंडळी उपस्थित होती.
अरविंद जगताप यांची पत्रलेखन हि खाजगी गोष्ट 'चला हवा येऊ द्याच्या माध्यमातून सर्वांची झाली आणि आता 'ग्रंथालीमुळे पुस्तकरूपाने अली याबद्दल आनंदव्यक्त केला.
यावेळी उपस्थित असलेल्या मान्यवरांपैकी काहींनी अरविंद जगताप यांच्याबद्दलच्या काही आठवणी ताज्या केल्या. ‘हिंदीमध्ये शेतकऱ्यांबद्दलचं पत्र काव्यात्मकभाषेत अरविंद जगताप यांनी लिहिले होतेअनुपम खेर याना ते प्रचंड आवडले होतेते पत्र वाचून माझ्याही डोळ्यांत अश्रू आले होते,' असे ही त्यांनी सांगितलेअशीआठवण निलेश साबळे यांनी सांगितली. 'पत्र ही आधीच्या काळी खूप जिवाभावाची गोष्ट असायची आणि अरविंदने आता पात्रांची जबाबदारी घेतली आहे.आजपर्यंतच्या निरनिराळ्या सिनेमांमधील त्याचे लिखाण खूपच अप्रतिम आहेयाचा मला अनुभवही आहे,' अशी भावना सयाजी शिंदे यांनी व्यक्त केली. 'एकलेखककवी म्हणून त्यांची लोकांमध्ये ओळख आहेचपण एक माणूस म्हणून कसं असावं हे मी त्यांच्याकडून शिकत आलो आहे,' अशी आठवण दिग्दर्शक संजयजाधव यांनी सांगितली.
पुस्तकाची मूळ किंमत १५० रुपये असून वाचकांना सवलतीत १०० रुपयात उपलब्ध आहेअसे 'ग्रंथाली'च्या वतीने सुदेश हिंगलासपूरकर यांनी जाहीर केले.

Subscribe to receive free email updates: