जल्लोषात साजरी होणार “दालमिया लायन्स उत्सव२०१७”...!गायन, नृत्य, फॅशन, फॅन्सी ड्रेस, फेस पेंटिंग, मेहंदी व्ही.जे हंट व विविध ५० स्पर्धांचा समावेश | २१ डिसेंबर व २२ डिसेंबर २०१७ रोजी पी.डी.लायन्स कॉलेज मालाड (प) येथे.

रेल्वे स्टेशनबस स्टोपचौपाटी आणि विविध सार्वजनिक ठिकाणी नागरिक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न
·        प्रथमच होणार आय.टी फेस्ट या विभागाची सुरुवात
·        मुंबईकर डान्स आणि बजाते रहो या दोन नवीन स्पर्धांचा आनंद
·        गायननृत्यफॅशनफॅन्सी ड्रेस, फेस पेंटिंगमेहंदी व्ही.जे हंट व विविध ५० स्पर्धांचा समावेश
·        २१ डिसेंबर व २२ डिसेंबर २०१७ रोजी पी.डी.लायन्स कॉलेज मालाड (प) येथे.
मुंबई 16 डिसेंबर २०१७ - मालाड मधील प्रख्यात प्रह्लादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे सध्या २८ व्या दालमिया लायन्स उत्सव १७ या फेस्टचे आयोजन २१ डिसेंबर व २२ डिसेंबर २०१७ रोजी करण्यात आले आहे. मुंबई आय एम पॉसिबल (MUMBAI - I_M_POSSIBLE)या थीमवर आधारित फेस्टमध्ये विविध प्रकारचे कार्यक्रम आणि स्पर्धा पाहायला मिळणार आहे . परफोर्मिंग आर्ट्सलिटररी आर्ट्स(साहित्यिक कला)फाईन आर्ट्स (ललित कला)गेमिंग अंड स्पोर्ट्समँनेजमेंन्ट अंड फिल्म फेस्टइनफोर्मलआणि आय.टी फेस्ट सर्व अश्या प्रकारच्या स्पर्धा आणि त्याच बरोबर काही नवीन स्पर्धा सुद्धा या वर्षी सुरु करण्यात आल्या आहेत.
भारताचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होती की मी नेहमीच एका डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिलेले आहे.” आणि हेच त्यांचे वाक्य मनात ठेऊन दालमिया कॉलेज ने या वर्षी आय.टी फेस्ट या विभागाची सुरुवात केली व या विभागाची थीम डिजिटल मुंबई अशी आहे. वेबपेज डिझाईनिंगवॉर ऑफ कोड,आय.टी क्यीझब्लाइंड टायपिंगअश्या सर्व प्रकारच्या डिजिटल स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे.
“दालमिया लायन्स उत्सव २०१७ चे अवचीत्या साधून रेल्वे स्टेशनबस स्टोपचौपाटी आणि विविध सार्वजनिक ठिकाणी भेट देऊन नृत्य प्रदर्शनपथ नाट्य व बॅनर यांच्या माध्यमातून आम्ही नागरिक जागरूकता निर्माण करण्याचा एक लहानसा प्रयत्न केला आहे. दालमिया लायन्स उत्सव अधिका-धिक यशस्वी करण्यासाठी तब्बल ५०० विद्यार्थी सहकार्य करत आहेत. विद्यार्थाना विविध क्षेत्रात चांगले प्रशिक्षिण देणे हा नेहमीच माझा प्रामाणिक प्रयत्न आहे.” असे सेल्फ फायनायंस कोर्स च्या उपप्राचार्य व दालमिया लायन्स उत्सवच्या समन्वियिका सुभाषिणी नायकर यांनी सांगितले.
परफोर्मिंग आर्ट्स या विभागात मुंबईकर डान्स आणि बजाते रहो या दोन नवीन स्पर्धांचा आनंद विध्यार्थ्यांना घेता येणार आहे. संगीत हे वाद्याचा वापर करूनच निर्माण करता येते असे नाही आहे. संगीत आपण कोणतेही साधन किंवा वाद्याचा वापर करून निर्माण करू शकतो. अशीच काहीशी बजाते रहो” या स्पर्धा मागची संकल्पना आहे. हि स्पर्धा मल्टी इन्स्ट्रमेंन्ट असून या स्पर्धेत ढोलताशाचमचेकाठी इत्यादि साधनांच्या मदतीने संगीत तयार करणे. मुंबई फेस्टीव्ह डान्स” हि मुंबईकर डान्स” या स्पर्धाची गणपती विसर्जन डान्सनवरात्रीतील गरबा आणि बॉलीवूड डान्स इत्यादी प्रसिद्ध सांस्कृतिक नृत्यांचा आनंद मुंबईकर नेहमीच घेत असतात. मुक्त होऊन नाचणे आणि एका ग्रुपद्वारे सर्व नृत्याचे सादरीकरण करणे हेच या स्पर्धाचे उद्दिष्ट आहे.
डी.एल.यु मध्ये सात प्रमुख विभाग असून त्यात कब्बडी, खो-खोक, लगोरी, फेस पेंटिंग, मेहंदी व्ही.जे हंट, शोर्ट फिम्ल आणि बर्याच अश्या विविध ५० स्पर्धांचा समावेश आहे. मुंबईतील ८५ कॉलेज मधल्या ८५० विद्यार्थ्यांनी अगोदरच आपली नोंदणी केली आहे.
काय – दालमिया लायन्स उत्सव २०१७
कधी – २१ डिसेंबर आणि २२ डिसेंबर २०१७
कुठे – प्रल्हादराय दालमिया लायन्स कॉलेज ऑफ कॉमर्स अंड इकोनोमिक्स मालाड (प)
वेळ – सकाळी १० ते रात्री ८.०० वाजे.पर्यंत
कॉलेज आय.डी वर विद्यार्थ्यांना प्रवेश विनामुल्य
अधिक माहितीसाठी - http://ift.tt/2zTpoRQ 

Subscribe to receive free email updates: