कलर्स मराठीवर रंगणार सरस्वती, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली मालिकांचे महाएपिसोड


मुंबई १५ डिसेंबर२०१७ : कलर्स मराठी वाहिनीवर येत्या रविवारी एका तासाचे महाएपिसोड प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत. सरस्वती, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेचे एका तासाचे विशेष भाग संध्या. ७ वाजल्यापासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. मालिकेमध्ये येणारे रंजक वळण जाणून घेण्यासाठी नक्की बघा कलर्स मराठी.
घाडगे & सून मालिकेमध्ये आता लवकरच एक रंजक वळण येणार आहे. अमृता आणि अक्षयला कियाराच्या वडीलांनी तीन महिन्यामध्ये वेगळं होण्याचे challenge दिले आहे. आणि हे challenge पूर्ण करण्यासाठी  अक्षय आणि अमृताने एक वेगळेच नाटक सुरु केले आहे. ते नाटक म्हणजे घटस्फोट मिळविण्याचे. अक्षय आणि अमृता घाडगे परिवारातील सदस्यांना त्यांच्या नात्यामध्ये किती प्रोब्लेम सुरु आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. ईतकच नाहीतर घटस्फोट मिळविण्यासाठी ते थेट वकीलाकडे देखील जाऊन पोहचणार आहेत. हा सगळा  ड्रामा ह्या महाएपिसोडमध्ये बघायला मिळणार आहे. पन हे करत असताना तो वकील त्यांना कशाप्रकारे मार्गदर्शन करेल? अमृता – अक्षय घटस्फोटासाठी माई आणि परिवाराला मनवू शकतील का ? अक्षयचा कियाराला स्वत:च्या आयुष्यामध्ये परत आणू शकेल का माईना हे कळल्यावर काय होईल अक्षयच्या या प्रयत्नामध्ये अमृताची देखील त्याला साथ आहे हे माईना कळल्यावर अमृता त्यांना कशी सामोरी जाईल असे आणि अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात आहेत. या सगळ्या गुंत्यामध्ये अक्षय आणि अमृता कसे आपल्या मैत्रीच्या नात्याला जपतील हे बघणे रंजक असणार आहे. याच बरोबर सरस्वती आणि राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेमध्ये देखील बराच ड्रामा घडणार आहे.
राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सत्यनारायणाची पूजा निंबाळकरांनी आदित्य आणि अन्वितासाठी ठेवली आहे. पणते दोघेही पूजेच्या वेळेस घरातून बाहेर निघून जातात. पूजा सोडून हे दोघे कुठे गेले आहे हे कोणालाच कळतं नाही. त्यामुळे राधा आणि प्रेम या दोघांनीही पूजेला बसावे असं घरांच्याच म्हणनं असतं. पणप्रेम हे स्वीकारेल का राधाबरोबर प्रेम या पूजेमध्ये बसेल का ?तसेच सत्यनारायणाच्या पूजेनंतर प्रेम आणि दीपिका एका पब मध्ये जातात आणि राधा प्रेमच्या या निर्णयावर काहीच बोलत नाही हे प्रेमच्या आईला पटत नाही. म्हणून राधाला प्रेमची आई त्या पबमध्ये पाठवते. पण राधा तिथे पोहचल्यावर नक्की काय घडतंप्रेम राधाशी कसा वागेल? दीपिका राधाबरोबर काय करते प्रेम राधाला साभांळून घेईल का ? या प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत.
सरस्वती मालिकेमध्ये विद्युलला वठणीवर आणण्यासाठी दुर्गाने रचले अजून एक नाटक. येत्या रविवारच्या भागामध्ये दुर्गा अंगात देवी येण्याचे नाटक करणार आहे ज्यामध्ये ती विद्युलला म्हणजेच मोठ्या मालकीणबाई यांना अनवाणी चालण्याचे तसेच उपवास ठेवण्याचे आव्हानं देणार आहे. संपूर्ण गाव देखील दुर्गाच्या या निर्णयाला सहमती देते कारण तिच्या अंगात देवी आली आहे आणि जणू देवी तिची इच्छा दुर्गाच्या रुपात व्यक्त करत आहे असे त्यांना वाटते. तेंव्हा आता पुढे काय होणार विद्युल हे आव्हानं कसं पूर्ण करणार दुर्गा नाटक करतं आहे हे विद्युलला कळणार का हे बघणे रंजक असणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका सरस्वती, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेचे एका तासाचे विशेष भाग १७ डिसेंबरला संध्या. ७ वाजल्यापासून फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :