मानवसेवा आणि एकात्मतेचा संदेश जगात पोहोचवा - व्यंकय्या नायडू
शिर्डी :-
श्री साईबाबांनी दिलेला मानवसेवा आणि एकात्मतेचा संदेश साईभक्तांनी जगभरात पोहोचवावा, असे आवाहन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले.
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने द्वितीय जागतिक साईमंदिर विश्वस्त परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रा.राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त सर्वश्री भाऊसाहेब वाकचौरे, अॅड.मोहन जयकर, प्रताप भोसले, विश्वस्त तथा नगराध्यक्षा योगिता शेळके, खासदार दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते. आजच्या परिषदेस देशभरातील २४ राज्यातील सुमारे १०२८ साईमंदिरांचे व परदेशातील सुमारे १९ साईमंदिरांच्या एकुण २ हजार विश्वस्त उपस्थित होते. यावेळी श्री.नायडू यांच्या हस्ते माय स्टॅम्प आणि संस्थानच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.
श्री.नायडू म्हणाले, साईबाबांनी आपल्या कार्य आणि विचारातून अनेकांना ऊर्जा प्रदान केली आहे. त्यांचा संदेश प्रेम, वात्सल्य आणि माणसाला एकमेकांच्या ह्रदयाशी जोडण्याचा आहे. भेदभाव विसरून माणसावर प्रेम केल्यास श्रद्धा आणि भक्तीचा सुंदर संगम जीवनात होतो. अशा विचारांची प्रेरणा शिर्डी येथून मिळत असल्याने या पावनभूमीत आल्याने समाधान वाटते, असे त्यांनी सांगितले.
उपराष्ट्रपती म्हणाले, भारत ही खऱ्या अर्थाने पुण्यभूमी आहे. अनेक साधूसंतांनी आपल्या महान विचारांनी समाजाला प्रेरीत केले. ‘मानवसेवा हीच खरी माधवसेवा’ असल्याचा आदर्श त्यांनी आपल्या कार्यातून जगासमोर ठेवला. भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व अशाच विचारात आहे. माणसाबरोबरच पशू, पक्षी, सर्व सजीव आणि निसर्गावर प्रेम करायला आपली संस्कृती शिकविते. हेच तत्वज्ञान साईबाबांनीदेखील सांगितले. त्यामुळे परिषदेच्या माध्यमातून चांगल्या अनुभवाचे आणि कल्पनांचे आदानप्रदान करीत भारतीयता आणि भारतीय संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न व्हावा, असे आवाहन त्यांनी केले.
वंचित आणि गरजूंची सेवा हीच साईबाबांची खरी भक्ती आहे असे सांगून श्री.नायडू म्हणाले, ‘श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे संयम’ हा साईबाबांचा मंत्र होता. असहाय लोकाविषयी केवळ सहानुभूती न दाखविता त्यांच्या मदतीला धावून जाणे ही खरी प्रार्थना आहे. केवळ पूजाविधीत न गुंतता सद्बुद्धी, सदाचार आणि सेवाभावनेने मन:शांती मिळते. सर्व विश्व तंत्रज्ञानक्रांतीने व्यापले जात असताना सुविचारांचे संस्कार जीवनावर करणाऱ्या गुरुचे जीवनात महत्वाचे स्थान असते.
साईबाबा मानवतेचा संदेश देणारे विश्वगुरू होते. हिंदू आणि सूफी विचारधारेचा सुंदर समन्वय त्यांच्या विचारात आहे. त्यांनी ‘वसुधैव कुटुंबकम्’ या भारतीय तत्वज्ञानाला साजेसा एकात्मतेचा संदेश जगाला दिला आहे. आपल्या कार्यातून त्यांनी अध्यात्म मांडले. मानवाला इच्छा-आकांक्षावर मात करीत मुक्तीचा आणि सेवेचा संदेश त्यांनी भक्तांना दिला. त्यांच्या संदेशाचे अनुसरण करीत सर्व प्रकारचे भेद बाजूला सारून पूर्वजांनी दिलेला व्यापकतेचा संदेश जगात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
समाजात संकुचित विचाराद्वारे निर्माण होणारी द्वेषभावना बाजूला सारण्यासाठी ‘आपण सारे एकाच ईश्वराची लेकरे आहोत’ या भावनेने मानवसेवेला समर्पित होण्याची आज प्रकर्षाने आवश्यकता आहे.. भारतीय संस्कृती महिलांचा सन्मान करायला, त्यांच्या उन्नतीला प्रोत्साहित करायला शिकविणारी आहे. नवभारताच्या उन्नतीसाठी अध्यात्मिक प्रगतीद्वारे असे समानता आणि एकात्मतेचे विचार जगभरातील साईभक्त समाजात पोहोचवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच आई, जन्मभूमी, मातृभाषा, गुरू आणि देश यांचा सन्मान सर्वांनी करावा आणि एक होऊन भारतीय संस्कृतीतील शाश्वत मुल्यांचा विचार जगात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.
संस्थानचे अध्यक्ष डॉ.हावरे आपल्या प्रास्ताविकात म्हणाले, साई चळवळ देशातील सर्वात मोठी चळवळ असून श्री साईबाबांनी श्रध्दा सबुरीचा मंत्र देवून सेवेचे तंत्रही दिले आहे. आजवर श्री साईबाबांची देशभरात ८००० तर जगात ५०० मंदिरे आहेत. साई समाधी शताब्दी सोहळ्याच्या माध्यमातून साईबाबा संस्थानच्यावतीने तिरुपती केशदान तर शिर्डीत रक्तदान या संकलपनेतून दररोज शिर्डीत रक्तदानाचे आयोजन करण्यात येत असून येत्या ३० डिसेंबर रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच देशातील सर्व साई मंदिरांनी ३० डिसेंबर रोजी आपल्या साई मंदिरात महारक्तदान शिबीराचे आयोजन करुन या कार्यात सर्वांनी सहभागी व्हावे.
पालकमंत्री प्रा.शिंदे म्हणाले, शिर्डीच्या पावनभूमीतून साईबाबांचा श्रद्धा आणि सबूरीचा संदेश जगभरात पोहोचला आहे. या पवित्रस्थळाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य शासनामार्फत करण्यात येत आहे. शिर्डी विमानतळाचा विकास करण्यात येऊन येत्या मार्चअखेरपर्यंत नाईटलँडींगची सुविधा करण्यात येणार आहे. त्यामुळे शिर्डी जगाशी जोडले जाईल, असे त्यांनी सांगितले.
श्री.विखे-पाटील यांनी जगभरातील साईमंदिराच्या माध्यमातून साईबाबांचा एकात्मतेचा संदेश जगात पोहोचविला जावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. साईबाबांनी जातीभेद न मानता मानवी सेवेचा संदेश दिला, असे त्यांनी सांगितले.
श्रीमती अग्रवाल यांनी कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत केले. तर संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम यांनी आभार मानले.
यावेळी मुख्य पोस्ट मास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल, विभागीय आयुक्त महेश झगडे, विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्णप्रकाश, विनयकुमार चौबे, जिल्हाधिकारी अभय महाजन व पोलीस अधिक्षक रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
Humanitarian Service and Integrity to the World……Venkayya Naidu
Shirdi-
“Shri Sai devotees should carry the message of humanitarian service and integrity given by Shri Saibaba to the World…” was the appeal made by Hon Vice President of India Mr. Venkayya Naidu to the global ensemble at Shirdi today.
He was speaking while inaugurating the second Global Sai Temple Trustee Summit held on behalf of the Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi. On this occasion Guardian Minister Prof. Ram Shinde, Leader of opposition Mr. Radhakrishna Vikhe Patil, Sansthan Chairman Dr. Suresh Haware, Vice Chairman Mr. Chandrashekhar Kadam, Trustees S/Shri Bhausaheb Wakchoure, Advocate Mohan Jaykar, Pratap Bhosale, Trustee and Chirman Municipal Council Mrs. Yogita Shelke, Member of Parliament Mr. Dilip Gandhi and Mr. Sadashiv Lokhande, Chief Executive Officer of the Sansthan Mrs. Rubal Agrawal and others were present.
For the Global Sai Temple Summit today, a total of around 2,000 Trustees with 1,028 arriving from Sai Temples from India and trustees from 19 Sai Temples from abroad were present. On this occasion “MY STAMP” Scheme as well as Annual Report of the Sansthan was also released at the hands of Mr. Naidu.
Speaking on the occasion Mr. Naidu said that Shri Saibaba has bestowed a huge energy to many through his work and thoughts. His message of love and affection is for connecting the people from heart to heart. If humans are loved without any discrimination, our lives could be full of faith and devotion superbly blended together. He said that he felt satisfied for being in Shirdi as inspiration from such thoughts is received from Shirdi.
Vice President further said that India is truly a pious land. Many saints and sages have inspired our society with their great thoughts. “Service to humans is the service to the God” was the ideal they placed before the world through their immense work. The greatness of Indian culture resides mainly in such great thoughts. Our culture teaches us to love all the animals, birds and all living beings as also the nature. The same philosophy was propagated by Shri Saibaba. He also appealed that through the deliberations at the Summit there should be an effort for conservation of being Indian and Indian culture through the medium of exchange of positive experiences and concepts.
Stating that the true devotion to Shri Saibaba is to serve the deprived and the needy, Mr. Naidu said that “Faith is trust and patience is restrain” was the mantra from Shri Saibaba. Instead of just showing sympathy for helpless people, the real prayer is in running forward to help them. Instead of getting absorbed in the pooja, you can achieve peace of mind through your consciousness, behavior and attitude for service. While the entire world is getting occupied by technological revolution, the place of a Guru who imbibes positive thoughts on life is most important.
Shri Saibaba was a Golabl Guru who gave the message of humanity. His thoughts consist of an impeccable blend of Hindu and Sufi thought processes. He gave a message of integrity to the World that was eminently suitable to the Indian Philosophy of “Vasudhaiva Kutumbakam”. He placed spirituality through his work. He gave a message to his disciples to go for freedom and service overcoming their wishes and aspirations. Mr. Naidu appealed that we should follow the message and sidelining all discrimination whatsoever, we should carry the message of inclusivity to the World provided by our ancestors.
In order to cast aside the hatred created in the society through the narrow mindedness, there is an imminent need for all of us to devote ourselves to humanitarian services. Indian culture teaches us to honor women and to encourage them for their prosperity. In order for the prosperity of New India, mr. Naidu said that he was confident that the Shri Sai devotees will carry and propagate the thoughts of equality and integrity through spiritual progress across the world. He appealed to the people that all of us should honor Mother, Motherland, Mother tongue, Guru and Nation and coming together carry the message of perennial values from Indian culture across the world.
In his opening remarks, Sansthan Chairman Dr. Suresh Haware said that the Sai Movement is the largest movement in the country. Along with Faith and patience, Shri Saibaba has also provided the technique for service. As on today there are 8,000 Sai Temples across India and 500 Sai Temples abroad. Through the medium of Shri Saibaba Samadhi Centenary Festival, Blood Donation Drive for daily collection of blood has been organized on behalf of the Sansthan at Shirdi on the lines of Hair Donation at Tirupati. On the 30th December this year we have organized a mega Blood Donation Camp at our Sai Temple, Shirdi. He appealed to all present to participate in this Mega Blood Donation Camp. At the same time we have requested all other Sai Temples in the country to organize Mega Blood Donation Camp at their respective Sai Temples.
Speaking on the occasion Guardian Minister Prof. Ram Shinde said that the message of faith and patience has reached across the world from the pious land of Shirdi. Efforts are being made for acceleration of development of this religious place at the Government of India level as well as the State Government level. Shirdi Airport is being developed further and by the end of March next year, the facilities for night landing at Shirdi will be provided. This will connect Shirdi to the world.
Mr. Vikhe Patil expressed his desire that through the medium of Sai Temples across the world Shri Saibaba’s message of integrity should be carried to the entire world. He said that Shri Saibaba gave a message of humanitarian services without discrimination in terms of caste and creed.
Srimati Agrawal welcomed the guests at the program and Sansthan Vice Chairman Mr. Chandrashekhar Kadam presented a vote of thanks.
On this occasion Chief Post Master General, Mr. Harishchandra Agrawal, Divisional Commissioner mr. Mahesh Zagde, Special Inspector General of Police Mr. Krishnaprakash, Vinaykumar Choube, District Collector mr. Abhay Mahajan, Superintendent of Police Mr. Ranjankumar Sharma and others were present.