शिवालयावर आनंदाचे वातावरण श्रीगणेशांना भेटायला आले त्यांचे आजी आजोबा

मुंबई२ जानेवारी : पृथ्वीलोकावरील दैत्यांचा संहार करण्यासाठी आणि एका भक्ताची देवमाता होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी श्री गणेशांनी कश्यप पत्नी अदिती यांच्या पोटी महोत्कट रुपात जन्म घेतला. आपलं त्या जन्मातलं अवतारकार्य संपवून श्रीगणेश स्वस्थानी म्हणजेच कैलासावर परतही गेले. परंतु काही कारणास्तव आदिशक्तीला मात्र भूलोकावरच वास्तव्य करणं भाग होतं. अशात श्रीगणेशांना शिवालयात एक सुखद आणि अनपेक्षित धक्का मिळालात्यांचे आजोबा हिमालय आणि आजी मैनावती सर्वांच कुशल जाणून घ्यायला शिवालयात आलेले आहेत. आपली कन्या पार्वती हिच्या अनुपस्थितीत महाराणी मैनावती श्रीगणेशांना आजीची माया तर देतीलच परंतु त्यांनी शिवालयात पाउल टाकताक्षणीच एक नवीन पवित्रा घेतलाय ... त्यांनी शिवालयाचा ताबाच घेतला आहे जणू. मात्र हि नवी व्यवस्था केवळ त्रासदायक ठरणार आहे. का पार्वती महादेव आणि श्रीगणेशांच्या आयुष्यावरही त्याचे पडसाद उमटणार आहेत पाहू या गणपती बाप्पा मोरया मालिकेच्या कथानकात फक्त कलर्स मराठीवर

Subscribe to receive free email updates: