झी युवावर आला होळीचा सण लय भारी !!


होळी म्हणजे रंगांचा सण. होळीच्या या रंगामध्ये रंगत ‘झी युवा’ या वाहिनीच्या सर्वच मालिकांमध्ये अनोखी होळी साजरी केली. अनिष्ट रुढींचे दहन करत कलाकारांनी इको फ्रेंडली होळी साजरी केली तसेच येणारे वर्ष सर्वांना सुखासमाधानाचे जावो अशी सदिच्छा ही यावेळी व्यक्त केली. पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी रासायनिक रंग घातक असल्याने नैसर्गिक रंगांचा वापर करून होळी, धुलीवंदन साजरी व्हावी यासाठी झी युवा च्या सर्व कलाकारांनी इको फ्रेंडली होळी खेळण्याचा संदेश आपल्या प्रेक्षकांना दिला.
झी युवावरील फुलपाखरू या मालिकेत, वैदेहीच्या घरी सर्व कॉलजेच्या गॅंग ने राडा करत होळी सेलिब्रेट केली. सध्या वैदेही आणि मानस यांनी घरी सांगितले त्यांचे नाते घरी सांगितले आहे आता होळीचा सण त्यांच्यासाठी काय नवीन घेऊन येत आहे हे बघणे महत्वाचे ठरेल. देवाशप्पथ मालिकेमध्ये शलोक आणि कुहूचे नाते आखू फुलायला लागले आहे. त्याचबरोबर होळीच्या उत्सवात चैतन्यस्वामींच्या आश्रमामध्ये श्लोकचैतन्य स्वामींच्या महालात त्यांना अडकवण्यासाठी चक्रव्यूह रचत आहे. देवाशप्पथ च्या सेटवर सर्वानी मिळून होळी शहरी केली. अंजली मध्ये अंजली आणि डॉ असीम ने होळीचा क्षण अनुभवताना एकमेकांवरील प्रेम सुद्धा अनुभवले. एकमेकांच्या डोळ्यात भावी आयुष्याची स्वप्ने पाहत एकमेकांना रंग लावून होळी सेलिब्रेट केली. बापमाणूस मालिकेत होळीचे सेलिब्रेशन नसल्यामुळे कोल्हापूर च्या सेट वरच सर्व कलाकारांनी इको फ्रेंडली होळी साजरी केली.कट्टी बट्टी मालिकेतील सर्व  कलाकारांनी अहमदनगर मध्ये पाण्याचा वापर करू नका हे सांगत होळीचा मनमुराद आनंद घेतला . डान्स महाराष्ट्र डान्स च्या सेट वर सुद्धा होळीच्या गाण्यावर ताल धरत स्पर्धकांनी धमाल केली.

Subscribe to receive free email updates: