अस्मितेसाठी लढावं ... पण बाईनं बाई सारखं वागावं ! स्त्री शक्तीची तीन रूपं – “कुंकू टिकली आणि टॅटू” कलर्स मराठीवर !

मुंबई, २८ मार्च २०१८ : काळ कितीही बदलला तरीही घर सांभाळते ती स्त्री ! मुलांचं संगोपनत्यांच्यांवर संस्कार ती स्त्री ! नवरासासरची माणसं सगळ्यांना साभांळून स्वत:ची अस्मिता जपते ती स्त्री ! घराला घरपण देते ती देखील स्त्रीच ! तरीही मर्यादांची बंधनं घातली जातात ती स्त्रीवर, बाईने बाईसारखं वागावं  हे देखील तिच्याच मनावर बिंबवण्यात येतं अगदी लहानपणापासून ! नियमांची चौकट,परंपरांचं ओझं एका स्त्रीवर थोपवलेलं असतं तिच्याच घरच्यांनीआपल्याच समाजानी आणि तिचं संपूर्ण आयुष्य ती जबाबदारी पार पाडण्यात जातं. परंतु हे चित्र आता बदलतं आहेआत्ताची स्त्री तशी राहिलेली नाही तिला स्वत:ची मतं आहेत, विचार आहेत. परंतु स्त्रियांनी त्यांचे विचार मांडणे यालाच बऱ्याचदा विरोध केला जातो. विशेषत: स्त्री वर्गाचाच याला विरोध झालेला जास्त करून दिसून येतो. जेंव्हा आजच्या काळातील मुलगी आपले विचार मांडते तेंव्हा तिला बंडखोर म्हंटले जाते.... अशाच परस्परविरोधी विचारसरणीतील द्वंद्व या कथासूत्रावर आधारित आणि युफोरिया प्रॉडक्शन्स निर्मित “कुंकूटिकली आणि टॅटू” प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. या मालिकेमध्ये गुरुराज अवधानी विष्णुपंत कुलकर्णी ही भूमिका साकारणार असूनसारिका निलाटकर – नवाथे विभा कुलकर्णी ही व्यक्तिरेखा साकारणार आहेत. यांच्यासोबत निवोदित भाग्यश्री न्हालवे, आदिश वैद्यश्वेता पेंडसे,अमोल बावडेकरराजेश देशपांडे, राजश्री निकम, प्रमुख भूमिकेत असणार आहेत.
विभा कुलकर्णी हे पुण्यातलं मोठं प्रस्थ आहे ... बाईन बाई सारखं वागावं”... आपल्या मर्यादेत रहावं ! अशी त्यांची भूमिका आहे. घरातील सुनाही विभाच्या शब्दाबाहेर नाहीत, त्यांनी आखून दिलेल्या चौकटीतच जगत आहेत. हे घर अत्यंत पारंपरिक पण प्रसंगी कर्मठ आहे.वडील, भाऊनवरा यांना समाधानात आणि सुखात ठेवण्याची जबाबदारी घरच्या स्त्रीवर आहे अशा विचारांवर उभं आहे. अशा घरामध्ये रमासारखी बिनधास्त, आताच्या युगातली कार्यक्षमस्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी सून म्हणून येते. रमाला बास्केटबॉल खेळायला आवडतोविभक्त कुटुंबातून आल्यामुळे रमाच्या मनामध्ये समस्त पुरुष जातीबद्दल आणि कुटुंब व्यवस्थेबद्दल नाराजी आहे. तिची स्त्री स्वातंत्र्याबद्दल ठाम मत आहेत. आणि जेंव्हा विभा आणि रमा या परस्परविरोधी विचारसरणी असलेल्या स्त्रिया एकमेकांसमोर येतील तेंव्हा घराचे घरपण, कौटुंबिक जिव्हाळा, एकमेकांबद्दलचे प्रेम या दोघी कशा टिकवून ठेवतील रमा आणि विभा कसा समतोल साधतील ?कुलकर्णी परिवार आणि विभा रमाला स्वीकारू शकतील का रमाची आधुनिक विचारसरणी आणि कुलकर्ण्यांचा परंपरावाद यांच्या मेळ बसेल का?  हे बघणे नक्कीच रंजक असणार आहे. 
या मालिकेच्या निमित्ताने कलर्स मराठी प्रमुखव्हायाकॉम -18 चे निखील साने म्हणाले, “मागील काही दिवसांपासून कलर्स मराठीवरील नाविन्यपूर्ण कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. कथा आणि मांडणीतील नवनवे प्रयोग प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत. आमच्या याच प्रयत्नांचा पुढील टप्पा म्हणजे कुंकू, टिकली आणि टॅटू ही मालिका. “कुंकू टिकली आणि टॅटू” या मालिकेमध्ये एकीकडे परंपरा आणि कर्मठ विचारसरणी तर दुसरीकडे आधुनिकतेचा ध्यास घेतलेली आजच्या मुलांची विचारसरणी यांची उत्तमरीत्या सांगड घातली आहे. जिव्हाळ्याचा विषय आणि त्याची नेहेमीपेक्षा वेगळी  मांडणी असल्याने आम्हाला खात्री आहे ही मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.  
कलर्स मराठीचे क्रिएटीव डिरेक्टर आणि मालिकेचे दिग्दर्शक विरेंद्र प्रधान म्हणाले, “जुनं ते वाईट आणि नवीन ते आपलं नाही या दोन भिन्न वैचारिक संघर्षात नात्यांचा दुरावत चाललेला प्रवास, आणि व्हाटसअप्पवर व्यस्त असलेलं मनं जेंव्हा आजीची गोधडी आणि नातू नातीची जीन्स स्वीकारेल तेंव्हाच आयुष्य सुंदर आणि होकारार्थी होईल. सासू सुनेचं नातं चॉकलेटच्या जाहिराती सारखं नाचायला लावणारं नसलं तरी प्रेमाच्या उबदार बंधनात जखडलं गेलं तर समस्त नवरे मंडळीदेवाच्या आणि दैवाच्या चरणी नतमस्तक झाल्याशिवाय राहणार नाहीत. जगातल्या सर्व नवरे आणि पुरुष मंडळींसाठी ही मालिका समर्पित. प्रत्येक स्त्रीला पटणारी आणि प्रत्येक पुरुषाने आपल्या घरातल्या सगळ्या स्त्रियांची नोंद घ्यायला लावणारी ही मालिका आम्ही घेऊन येत आहोत कलर्स मराठीवर”...
आपल्या भुमिकेबद्दल बोलताना सारिका निलाटकर नवाथे म्हणाल्या, “कुंकूटिकली आणि टॅटू ही मालिका थोडी वेगळ्या ढंगाची आहे आणि माझी या मालिकेतील भूमिका थोडी वेगळीच आहे. मालिकेमध्ये मी विभा कुलकर्णी या नावाची भूमिका साकारणार आहे. विभा परंपरेला धरून चालणारी स्त्री आहे... या पात्राची काही तत्वमूल्य आहेत जी आजच्या मुलांना बंधंन वाटू शकतात. तिच्या या तत्वांना तिचे स्पष्टीकरण आहे आणि त्यामुळे तिच्या बोलण्याचा हेतू लगेचच स्पष्ट होतो. घरामध्ये आलेली सून आणि विभा यांच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे तेंव्हा या कशा एकमेकींना समजून घेतील हे प्रेक्षकांनी बघण्यासारखे असणार आहे. मी या भूमिकेबद्दल खूपच उत्सुक आहे.आमची मालिका प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री आहे”.
रमा आणि विभा या परस्परविरोधी विचारसरणीमुळे कुलकर्णी घरात संघर्षाची ठिणगी पेटते. परंपरा चुकीच्या नाहीत पण त्या परंपरेतच स्वत:चे पाय अडकवून घेण्यापेक्षा त्या परंपरांना आपलसं करून पुढे उज्वल प्रवास करणे हे महत्वाचे आहे. तेंव्हा बघायला विसरू नका स्त्री शक्तीची तीन रूपंसावरणार घर कौलारू, एकाच छताखाली नांदणार “कुंकूटिकली आणि टॅटू” या २ एप्रिलपासून सोम ते शनि रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates: