गेल्या काही वर्षात महाराष्ट्रामधल्या असंख्य युवकांच्या मनात आपलं एक प्रेमाचं आणि हक्काचं स्थान निर्माण केलेली मराठी वाहिनी म्हणजे झी युवा.. देवाचं अस्तित्वखरंच आहे की नाही? श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील नेमका फरक काय? आस्तिक असणं योग्य आहे की नाही? समाजामध्ये सुरु असलेल्या या द्वंद्वावर भाष्य करणाऱ्याझी युवा या वाहिनीवरील "देवाशपथ" या मालिकेतील श्लोक (संकर्षण कऱ्हाडे) हा अश्रद्ध आहे. त्याचा घरच्यांचा अति देव-देव करणं त्याला अजिबात पटत नाही.
कुहू (कौमुदी वलोकर) आपल्या बाबाला श्लोकबद्दल सांगावं की नाही या संभ्रमात गुंतत चालली आहे. कुहूच्या बाबाला श्लोक अजिबात आवडत नाही पण श्लोकशिवाय तीराहू पण शकत नाहीये. ज्या नारळावरून श्लोकच्या भविष्याची दिशा ठरणार आहे ते अण्णा महाराजांनी श्लोकच्या घरात ठेवलेलं आहे, जे गुढीपाडव्याच्या दिवशी फोडलंजाणार आहे. हे नारळ फोडताना कुहू तिथे असायला हवी असं अण्णा महाराजांनी श्लोकच्या वडिलांना सांगितल्यामुळे कुहू गुढीपाडव्याच्या दिवशी दशपुत्रेंच्या घरी जाणारआहे. नेमकं काय होईल गुढीपाडव्याच्या दिवशी? अण्णा महाराज आणि नारायण यांची भेट होईल का? जर खरंच घरात असलेलं नारळ श्लोकच्या भविष्याची दिशाठरवणार असेल तर श्लोकला त्याची प्रचिती येईल का? गुढीपाडव्याच्या निमित्तावर कुहू तिच्या जोडीदाराबद्दल तिच्या बाबाला खरं काय ते सांगू शकेल का? कुहूचीश्लोकच्या भविष्याबद्दलची काळजी अण्णा महाराज मिटवू शकतील का?
जाणून घेण्यासाठी पहा गुढीपाडव्यानिमित्त देवाशपथ या मालिकेचा महाएपिसोड येत्या रविवारी म्हणजेच १८ मार्च २०१८ दु. १ आणि सायं ७ वाजता फक्त झी युवावर