शिर्डीस ज्याचे लागतील पाय। टळती अपाय सर्व त्याचे।। या भावनेतून आपल्या धकाधकीच्या आयुष्यातून वेळ काढून साईसेवक मंडळाच्या साईभक्तांनी मुंबई ते शिर्डी पदयात्रा १९८१ पासून सुरू केली. साईबाबांची पालखी घेऊन या मंडळांतील हजारो भक्त श्री रामनवमीच्या उत्सवासाठी दरवर्षी पायीशिर्डीला जातात. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी साईसेवक मंडळाच्या साईपालखी पदयात्रेचा भव्य शुभारंभ गुरुवार १५ मार्चला दादर परिसरातून होणार आहे. दुपारी १२ वाजता मध्यान्ह आरती करून ही पदयात्रा निघेल ती शुक्रवार २३ मार्चला शिर्डी मुक्कामी पोहचेल.
साईबाबांच्या समाधीचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्ताने १५ ते २३ मार्च असे नऊ दिवस भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काकड आरती, अभिषेक, श्री साईंची भव्य पालखी मिरवणूक तसेच शिर्डी लेंडी बागेत श्री साईचरित्रच्या २१ पोथ्यांचे पारायण होणार आहे. या साई उत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे. मंडळाचे यापुढचे कार्य व त्यांचे भावी उपक्रम एका क्लिकवर उपलब्ध व्हावे या दृष्टीने अॅप्ची निर्मिती करण्यात आली आहे. या अॅपमुळे भक्तांशी असलेले नाते अधिक दृढ व्हायला मदत होणार असल्याची भावना मंडळाकडून व्यक्त करण्यात आली. https://play.google.com/store/ apps/details?id=com.deeptrack. saiseva या लिंकद्वारे हे अॅप् डाऊनलोड करता येईल.
पालखी सोहळ्यातील नाव नोंदणीसाठी खालील लिंकवर संपर्क करावा.
Website registration Link - www.saisevakmandalmumbai.com/ register