रॉकिंग राऊत!

'सा रे ' लिटिल चॅम्प्स फेम, महाराष्ट्राचा आवडता तरुण गायक, रोहित राऊत, याला नुकत्याच पार पडलेल्या रेडिओ मिरची संगीत पुरस्कारांमध्ये, बेस्ट फिल्म सॉंग ऑफ इयर: हृदयात वाजे समथिंग’ आणि बेस्ट अल्बम ऑफ इयर: ती सध्या काय करते’ साठी तब्बल पुरस्कार देण्यात आले.
रोहितला एकूण गटात नामांकने होती, त्यापैकी गटात, परीक्षकांच्या बहुमतांनी, त्याने पुरस्कार पटकावले.
आनंद व्यक्त करताना रोहित म्हणतो, " हे वर्ष माझ्यासाठी खूप खास होतं. मला प्रत्येक टप्प्यावर पाठिंबा दिला तो म्हणजे माझ्या संगीत क्षेत्रातील दिग्गजांनी, माझ्या मित्रांनी आणि अर्थात घरच्यांनी. त्यांनी माझ्यावर केलेलं जीवापाड  प्रेम आणि त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मी कधीही विसरू शकणार नाही. मला मिळेलेले पुरस्कार हे माझ्यासाठी अधिक चांगलं काम करण्याचं प्रोत्साहन असतं माझ्या परीने मी नक्कीच उत्तम काम करत राहीन.”
रोहित, तुला आमच्या खूप खूप शुभेच्छा आशा आहे तुझा अल्बम लवकरच भेटीला येईल.

Subscribe to receive free email updates: