Shri Ramnavami Festival 2018 News (SSST SHIRDI)

शिर्डी –
     श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने शनिवार दिनांक २४ मार्च २०१८ ते सोमवार दिनांक २६ मार्च २०१८ याकाळात श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार असून या निमित्‍ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी  अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली. यासाठी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी दिनांक २५ मार्च रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. तरी जास्‍तीत जास्‍त साईभक्‍तांनी श्रींच्‍या दर्शनाचा लाभ घ्‍यावा असे याव्‍दारे आवाहन करण्‍यात येत आहे.
     श्रीमती अग्रवाल म्‍हणाल्‍या, श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्‍यात आली. तेंव्‍हापासून प्रतीवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहाच्‍या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. यावर्षी यानिमित्‍ताने शनिवार दिनांक २४ मार्च रोजी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वाजता श्रींच्‍या फोटोची व पोथीची मिरवणूक, ५.१५ वा. व्‍दारकामाईत श्री साईसच्चरिताचे अखंड पारायण,५.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद आदि कार्यक्रम होणार आहे. दुपारी ४.०० वा. ते सायं.६.०० यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर कीर्तन होणार आहे. सायंकाळी ६.३० वा.धुपारती होणार असून रात्रौ ९.१५ वा. चावडीत श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर रात्रौ १०.३० वा. शेजारती होईल. यादिवशी पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर उघडे राहणार आहे.
     रविवार, दिनांक २५ मार्च रोजी पहाटे ४.३० वा. श्रींची काकड आरती, पहाटे ५.०० वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींच्‍या फोटो व पोथीची मिरवणूक होईल. पहाटे ५.२० वा. कावडींची मिरवणूक व श्रींचे मंगलस्‍नान होईल. सकाळी १० ते १२ यावेळेत समाधी मंदिराशेजारील स्‍टेजवर श्रीरामजन्‍म किर्तन कार्यक्रम,दुपारी १२.३० वा. माध्‍यान्‍ह आरती होणार आहे. दुपारी ४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं.५.०० वा. श्रींच्‍या रथाची गावातून मिरवणूक होणार आहे. मिरवणूक परत आल्‍यानंतर सायं.६.३० वा. धुपारती होईल. रात्रौ १०.०० ते पहाटे ५.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. तसेच हा उत्‍सवाचा मुख्‍य दिवस असल्‍याने समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहील. यामुळे दिनांक २५ मार्च रोजीची नित्‍याची शेजारती व दिनांक २६ मार्च रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. दिनांक २५ मार्च रोजी प्रसादालय रात्रौ ११.०० वाजेपावेतो सुरु राहील. तसेच दिनांक २४ मार्च ते २६ मार्च या कालावधीत वाहन पूजा बंद राहील व दिनांक २५ व २६ मार्च रोजी अभिषेक व श्री सत्‍यनारायण पूजा बंद राहील.  
     उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सोमवार, दिनांक २६ मार्च रोजी पहाटे ५.०५ वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन,सकाळी ६.३० वा. गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक, सकाळी १०.३० वा. गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायं.६.३० वा. धुपारती होवून रात्रौ १०.३० वा. श्रींची शेजारती होईल.
     उत्‍सव कालावधीमध्‍ये रोज सायं. ७.०० ते रात्रौ १०.०० यावेळेत निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम जुने प्रसादालय परिसरात होणार आहेत. यामध्‍ये दिनांक २४ मार्च रोजी श्री.नितीन मुकेश यांची भजनसंध्‍या,दिनांक २५ मार्च रोजी स्‍वरश्री आनंद प्रतिष्‍ठाण यांचा कार्यक्रम व दिनांक २६ मार्च रोजी श्री.श्रीधर फडके यांचा गीतरामायणचा कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला आहे. उत्‍सवाचे निमित्‍ताने व्‍दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्‍चरिताच्‍या अखंड पारायणामध्‍ये जे साईभक्‍त भाग घेवू इच्‍छीतात अशा साईभक्‍तांनी आपली नावे शुक्रवार दिनांक २३ मार्च २०१८ रोजी दुपारी १.०० वा. ते सायंकाळी ५.३० वा. यावेळेत समाधी मंदिरातील व्‍यासपीठावर नोंदवावीत. त्‍याच दिवशी सोडत पध्‍दतीने पारायणसाठी भक्‍तांची नावे सायंकाळी ५.३५ वा. निश्चित करण्‍यात येतील. तसेच दिनांक २५ मार्च या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी होणारे कलाकारांचे हजेरी कार्यक्रम मंदिर परिसरातील १६ गुंठे येथील शताब्‍दी मंडपात आयोजित करण्‍यात आले आहेत. त्‍यासाठी इच्‍छुक कलाकरांनी आपली नावे त्‍याच दिवशी समाधी मंदिराशेजारील अनाऊन्‍समेंट सेंटरमध्‍ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत असे सांगून सर्व साईभक्‍तांनी या उत्‍सवास उपस्थित राहून उत्‍सवाची शोभा वाढवावी असे आवाहन ही श्रीमती अग्रवाल यांनी केले आहे.
     उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, उपाध्‍यक्ष चंद्रशेखर कदमसर्व विश्‍वस्‍त व मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे उपजिल्‍हाधिकारी धनंजय निकममनोज घोडे पाटीलपोलिस उपअधिक्षक आनंद भोईटेउपकार्यकारी अधिकारी डॉ.संदीप आहेरसर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.


Shri Ram Navami Festival 2018 at
Shri Saibaba Sansthan, Shirdi
            On behalf of Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi a culturally rich Shri Ram Navami Festival will be celebrated between 24th March 2018 and 26th March 2018. While giving this information, Shrimati Rubal Agrawal, Chief Executive Officer of the Sansthan said that various programs have been scheduled on this occasion. She said that the Samadhi Temple will be kept open for the entire night on the main day of the celebrations that is on the 25th March 2018. She appealed to devotees to arrive in large numbers for Shri Saibaba Samadhi Darshan on this occasion.
            Shrimati Agrawal said that Shri Ram Navami Festival was started with the blessings of Shri Saibaba in 1911 and since then the Festival is celebrated with fervor at Shirdi every year. On this occasion on the 24th March there will be kakad aarti at 4.30 am. At 5.00 am, a procession will be taken out with a Shri Saibaba Photo and Pothi. At 5.15 am, there will be continuous recital of Saisachharit at Dwarakamai followed by Holy bath for Shri Saibaba at 5.20 am. There will be Noon Aarti at 12,30 Noonfollowed by Teerth-Prasad and other programs. Keertan will be performed between 4 pm and 6 pm at the stage near Samadhi Temple. Dhupaarati will be performed at6.30 pm. A procession of Shri Saibaba Palanquin will be taken out through the city at 9.15 pm. After the procession returns Shejaarti will be performed at 10.30 pm.Dwarakamai Temple will be kept open for the entire night on this day for reading the Holy Scripture.
            On Sunday the 25th March, Kakad aarti will be performed at 4.30 am followed by end of continuous recital at 5 am and with a procession of Shri Saibaba Photo and Pothi. Holy Bath for Shri Saibaba will be held at 5.20 with the arrival of water filled vessels. A Ram Janma Keertan will be held at the stage near Samadhi Temple between 10 am and 12 noon. Noon Aarti will be held at 12.30 noon. At 4 pm there will be a procession of flags followed by a procession of Shri Saibaba Chariot through the city at 5 pm. After the procession returns Dhoopaarti will be performed at 6.30 pm. A program of the intending artists will be held between 10 pm and 5 am next day.
            As this is also the main day of celebrations, Samadhi Temple will be kept open for the entire night. Therefore the regular Shejaarti on the 25th and early morning Kakadaarti on the 26th will not be held.     
              Prasadalaya will be open till 11 pm on the 25th March. The Vehicle Pooja will be closed for two days on the 24th and 25th March and Abhishek as well as Shri Satyanarayan Pooja will be closed on the 25th and 26th March 2018.
On the last day of celebrations that is on Monday the 26th March the holy bath for Shri Saibaba and Darshan will be performed at 5.05 am. Rudra Abhishek will be performed at Gurusthan Temple at 6.30 am. GopalKala Keertan and Dahi Handi will be held at 10.30 am. Noon Aarti will be held at 12.10 noon followed by Teerth Prasad. Dhoopaarti will be held at 6.30 pm and Shejaarti at 10.30 pm.
During the period of celebrations invited artists will present their talents at the place of Old Prasadalaya between 7 pm and 10 pm daily. On 24th Mr. Nitin Mukesh will present Bhajan Sandhya, on 25th March S/Shri Anand Pratishthan will present a program. On the 26th March Mr. Shridhar Phadke will present Geet Ramayan.
Devotees interested in continuous reading of Shri Sai Saccharit to be held at Dwarakamai Temple on the first day of the celebrations are requested to register their names at the stage near Samadhi Temple on the 23rd March 2018 between 1 pm and 5.30 pm. The names of the devotees will be decided through a DRAW and will be declared on the same day at 5.35 pm.
Presentations from artists intending to perform on the 25th that is the main day of the Festival have been organized at Shatabdi Pandal located at 16 Gunthe in Temple surroundings. Interested artists should register their names in advance and on the same day with Announcement Center staff in position. Shrimati Agrawal has appealed to devotees to participate in this important occasion in large number and create a glittering festival.
Under the mentorship and guidance of Sansthan Chairman Dr. Suresh Haware, Vice Chairman Mr. Chandrashekhar Kadam, all Trustees of the Sansthan and Chief Executive Officer Shrimati Rubal Agrawal, Dy. Collector Mr. Dhananjay Nikam and Mr. Manoj Ghode Patil, Deputy Superintendent of Police Mr. Anand Bhoite, Dy Executive Office Dr. Sandeep Aher, all administrative officers, Heads of Departments and entire staff are making concerted efforts in order to make the Festival program a grand success. 

Subscribe to receive free email updates: