मुंबई, ९ जानेवारी २०१७ : महाराष्ट्रात कलेची आणि गुणी कलाकारांची कमी नाही. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या डांस शो मध्येदेखील महाराष्ट्रातील असेच कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला कलर्स मराठी घेऊन येणार आहे. ज्यांच्या डांसमध्येMADness असेल त्यांना या कार्यक्रमामध्ये येण्याची संधी मिळणार आहे. 2 MAD - महाराष्ट्राचा अस्सल डान्सर या कार्यक्रमाच्या ऑडीशन्सच्या वेळेस अनेक अफलातून डांसर आले ज्यांनी त्यांच्यातील कला गुण,वेगवेगळ्या नृत्यशैली परीक्षकांना दाखवल्या आणि परीक्षकांची मने जिंकली. या ऑडीशनमध्ये अनेक लहान मुल देखील आली पण वयोमर्यादेमुळे त्यांना या कार्यक्रमाचा भाग होता आल नाही पण त्यांनी परीक्षकांकडून दाद मिळवली. अशीच एक चिमुकली या मंचावर आली आणि जिने सगळ्यांना आपलस केले.
प्रचिती जी अवघ्या ५ वर्षांची आहे तिने तिन्ही परीक्षकांना वेड लावल. तिच्या डांस मूव्हज, चेहऱ्यावरील हावभाव, स्टेप्स आणि तीच बोलण हे सगळच परीक्षकांना भावल. तिने डांस सुरु करताच परीक्षक थक्क झाले,
असेच भरपूर डांस तुम्हाला बघायला मिळणार आहेत 2 MAD - महाराष्ट्राचा अस्सल डांसर या कार्यक्रमामध्ये. तेंव्हा बघायला विसरू नका ९ जानेवारी पासून 2 MAD फक्त कलर्स मराठीवर सोम- आणि मंगळ रात्री ९.३० वाजता.