कलर्स मराठीवरील सरस्वती मालिकेमध्ये साजरी होणार मकर संक्रांत

सरस्वती: मकर संक्रात म्हणजे पहिली गोष्ट आठवते ती तीळगुळाचे लाडूतिळाच्या वड्या आणि हलवा. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यत सगळ्यांच हे तीळगुळाचे लाडू आवडतात. हे लाडू घेऊन घरोघरी जायचे आणि सगळ्यांना तीळगुळ घ्या गोड गोड बोला अस सांगायचंयामध्ये गंमतच काही वेगळी असते. कलर्स मराठीवरील प्रेक्षकांची आवडती मालिका सरस्वती मध्ये देखील मकर संक्रांत साजरी केली जाणार आहे. सरुची म्हणजेच सरस्वतीची हि पहिली मकर संक्रांत आहे. ज्यासाठी सरस्वतीने खास घरातल्यांसाठी आणि राघवसाठी तीळ गुळाचे लाडू केले आहेती काळी साडी घालणार आहे. मामा कान्हा बरोबर मिळून मज्जा करत आहेतते दोघ मिळून कान्हासाठी लाडू चोरत आहेत कारण कान्हाला हे लाडू खूपच आवडतात. सरस्वती आणि राघव तसेच सर्जेराव आणि रेणू यांमध्ये पतंग उडविण्याची चुरस देखील दाखविण्यात येणार आहे. ज्यामध्ये आता कोण जिंकेल हे माहिती नाही. पण तुम्ही सरस्वतीचा हा मकर संक्रांत भाग नक्की पहा कलर्स मराठीवर यावर बोलताना तितिक्षा म्हणाली, “घराच्यापेक्षा सेटवर खूप मज्जा येते कारण सगळच अगदी नीटपणे साजर केल जात. मला फक्त तिळाचे लाडू आणि हलवा इतकच माहिती होतंपण मालिकेमध्ये बरच काही प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. त्यातून सरस्वतीची हि पहिलीच मकर संक्रांत आहे त्यामुळे मी खूप छान अशी काळ्या रंगाची साडी घातली आहे. सरस्वतीला हाताला लागल असूनही राघवसाठी प्रेमाने तिळाचे लाडू केले आहेतमला खात्री आहे ते त्यांना आवडतील. मी कधीच पतंग उडवली नाही म्हणून पतंग पहिल्यांदाच उडवताना मज्जा येणार आहे हे नक्की.
अस्स सासर सुरेख बाईमध्ये जुईची पहिली मकर संक्रांत
मृणाल दुसानीस: अस्स सासर मध्ये देखील मकर संक्रांत साजरी केली जाणार आहेपण जुई दुबईला जाणार असल्याने ती परत आल्यानंतर जुईच्या सासू बाई मोठ्या थाटात जुईच्या पहिली संक्रांत साजरी करणार आहेत. मालिका आणि खऱ्या आयुष्यात मृणालची हि पहिलीच मकर संक्रांत आहे. यावर मृणाल म्हणाली, “अस्स सासर सुरेख बाई या मालिकेच्या चित्रीकरणात सध्या मी व्यस्थ आहे.  पण लग्नानंतरची पहिली मकर संक्रात असल्यामुळे मी खूपच उत्सुक आहे. मी माझ्या सासरीदेखील जाणार आहेजिथे माझ्या सासूबाईनी हळदी-कुंकूचा कार्यक्रम ठेवला आहे. मी नक्कीच काळ्या रंगाची साडी आणि हलव्याचे दगिने देखील घालणार आहे. पहिली संक्रात असल्यामुळे हि भावना खुपच वेगळी आहे. नीरज यांना सरप्राईझ द्यायची सवय आहे त्यामुळे संक्रातीच्या निमित्ताने नक्कीच मला काही गिफ्ट मिळेल अस वाटत आहे. ते भारतामध्ये नसल्याने मला गिफ्ट काय मिळेल हे मला सध्या तरी माहिती नाही. पण तुम्हाला माझ्याकडून मकर संक्रातीच्या खूप शुभेच्छा”.
सख्या रे मालिकेमधील रुची सवर्णची पहिली मकर संक्रांत
रुची सवर्ण मोहन : आमच्या घरी मकर संक्रांत खूप थाटात साजरी केली जाते. हळदी कुंकूतीळ गुळाचे लाडू अस सगळच. माझी लग्नानंतरची हि पहिलीच मकर संक्रांत आहे, त्यामुळे मी नक्कीच उत्सुक आहे. पण माझा नवरा पंजाबी असल्यामुळे मकर संक्रांत साजरी होईल कि नाही माहिती नाही पण मी अंकितसाठी तीळ गुळाचे लाडू बनवणार आहे. सध्या सख्या रे हि माझी नवीन मालिका सुरु आहे त्याच्या सेटवर देखील मी लाडू घेऊन जाणार आहे. माझी पहिली संक्रांत असल्याने मी उत्सुक आहे मला काय गिफ्ट मिळेल या बद्दल.
गणपती बाप्पा मोरया
मकरसंक्रांतीचा सण म्हणजे नात्यातली कटुता विसरून त्यात  गोडवा पेरण्याचा मधुर अवसरमुळातच जे नातं परस्पर प्रीतीच्या माधुर्याने ओतप्रोत भरलेलं आहे त्या नात्यात हा सण एक निराळीच गोडी निर्माण करणारा ठरणार नाही का?  शिव शक्तीचं नातंही काहीसं तसंच आहे.  अतूटअविनाशीआणि उत्कटश्रीगणेशांनी शिव आणि शक्तीच्या पुनर्विवाहाची योजना केली आहेती साकार होण्यासाठी महादेव कशी मिळवतील आदिशक्तीची अनुमती? बघा मकर संक्रांतीच्या विशे भागामध्ये कलर्स मराठीवर.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :