वेगवेगळ्या माध्यमांमधून आपल्याला चित्रपट पाहण्याची संधी मिळत असली तरी टीव्ही हे माध्यम सर्वांसाठी जवळचे असते. टीव्हीचा मोठा चाहता वर्ग हा बच्चेमंडळींचाच असल्याने फक्त मराठी वाहिनीने बच्चे कंपनीला डोळ्यांसमोर ठेवून मिनी थिएटरच्या माध्यमातून अॅनिमेटेड सिरीजची आगळी भेट छोट्यांसाठी आणली आहे. वेगवेगळ्या जॅानरचे चित्रपट व विविध विषयांवरचे चित्रपट महोत्सव, हे फक्त मराठी वाहिनीचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल.
विविध अॅनिमेटेड फिल्म्स आणि त्यातील व्यक्तीरेखा, मुलांना चांगल्याच ओळखीच्या आहेत. बच्चे कंपनीच्या आवडत्या ‘कुंग फू मास्टर्स ऑफ झोडियाक सिरीज’(Kung Fu Masters Of Zodiac Series) ची धमाल मेजवानी १ मे पासून सोमवार ते शनिवार सकाळी ११.०० वाजता फक्त मराठी वाहिनीवर घेता येईल, तसेच याचे पुन:प्रसारण रविवारी सकाळी ८.३० ते ११.३० वा. या वेळेत होईल.
अॅनिमेशन सिरीजची ही जादूई सफर छोट्या मित्रांसाठी मेच्या सुट्टीतील आनंदाची पर्वणी ठरणार आहे.