येसूबाई करणार शंभूराजांचं स्वागत

शूर आबांचे शूर छावे शंभूराजे मोठ्या रुपात पडद्यावर अवरतले आणि प्रेक्षकांची अनेक दिवसांची प्रतीक्षा संपलीमोठ्या रुपातील शंभूराजांचा पराक्रम आणिबुद्धीचातुर्याचे अनेक दाखले आपण स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेत पाहाणार आहोतचशंभूराजांच्या आगमनाची जितकी प्रतीक्षा प्रेक्षकांना होती तितकीच किंबहुनात्याहून अधिक हुरहुर निर्माता – अभिनेता डॉअमोल कोल्हेला होतीनिर्माता आणि अभिनेता अशी दुहेरी कसरत डॉअमोल कोल्हे मोठ्या शिताफीने आणि प्रगल्भतेनेहाताळतोयही भूमिका साकारण्याचा योग येणं म्हणजे श्रींची इच्छा हाच भाव त्याच्या डोळ्यांत आणि बोलण्यात जाणवतोडॉअमोल कोल्हे यांनी यापूर्वीही महाराष्ट्राचंदैवत श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची भूमिका साकारली त्याचप्रमाणे नाटकाच्या माध्यमातून त्याने शंभूराजेही रंगभूमीवर सादर केले पण त्याहून या मालिकेचं आव्हानअधिक मोठं आहेया भूमिकेसाठी वजन कमी करण्यापासून शंभूराजांच्या व्यक्तिमत्त्वातले बारकावे समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतंशंभूराजांचे कुटुंबातीलप्रत्येक व्यक्तीशी असणारे बंध उलगडून दाखवताना त्यांच्या खाजगी आयुष्यातील नातेसंबंधावरही या मालिकेतून प्रकाश टाकाला जातोयकय्युमखानावर विजयमिळवून आलेल्या शंभूराजांचं स्वागत येसूबाई कसं करणार याचीही एक निराळी उत्सुकता आहेशंभूराजांनी लिहिलेला बुधभूषण ग्रंथ येसूबाईंच्या हाती लागतोत्याच्याउत्सुकतेपोटी त्या दरबारात या ग्रंथाचं वाचन ठेवतातयाच दरम्यान अणाजी आणि शंभूराजेंमध्ये मतभेदाची ठिणगी पडते आणि नव्या राजकारणाची सुरुवात होतेयेसूबाई आणि शंभूराजांची पहिली भेट आणि स्वराज्यातल्या नव्या राजकीय गणितांची सुरुवात अशा अनेक घडामोडी येत्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहेत.
येसूबाई आणि शंभूराजे या पती पत्नीच्या प्रगल्भ नात्याचे वेगळे पदर या मालिकेच्या निमित्ताने उलगडले जाणार आहेतपराक्रम आणि बुद्धीचातुर्याचं  देणं शंभूराजांनाजन्मत: मिळालं होतंपण व्यक्ती केवळ त्याच्या पराक्रमाने श्रेष्ठ ठरत नसते तर त्याच्यातल्या माणूसपणाने त्याचं श्रेष्ठत्व अमर होतंशंभूराजांची ही गाथा केवळत्यांच्या पराक्रमाचा इतिहास नव्हे तर त्यांच्यातल्या सद्सद्विवेकीकुटुंबवत्सल माणसाची आणि न्यायी राजाची ही कथा आहेइतिहास रचतानाही माणूसपणजपणाऱ्या शंभूराजच्या गाथेचे अनेक पदर येत्या भागांत या मालिकेतून उलगडले जाणार आहेत.

Subscribe to receive free email updates: