मुंबई, १९ डिसेंबर, २०१७ : सरस्वती मालिकेमध्ये दुर्गाची एन्ट्री झाली आणि पहिल्या दिवसापासून दुर्गाची भाषा, तिची बोलण्याची स्टाईल, सगळचं प्रेक्षकांना आवडत आहे. दुर्गाचं उद ग अंबे उद बोलण्याची स्टाईल असो वा विद्युलला कैकालीच्या आईसाहेब बोलणं असो वा भुजंगला लबाड बोलण असो प्रेक्षकांनी सगळ्यालाचं पसंती देतं आहे. दुर्गाचा बेधडक आणि बिनधास्त स्वभाव विद्युलवर भारी पडतं आहे. तिच्या प्रत्येक कारस्थानांना, चालींना दुर्गा उलटून लावत आहे. या सगळ्या घटनांमध्ये प्रेक्षकांना अजून एक सरप्राईझ मिळाले ते म्हणजे त्यांची लाडकी सरस्वती, मोठ्या मालकांची सरू मालिकेमध्ये नुकतीच परतली. एकीकडे दुर्गा हि अत्यंत बिनधास्त आणि सरस्वती थोडी जपून वागणारी, दुसऱ्यांच्या मनाचा विचार करणारी अशी आहे. दुर्गाचा वाड्यातील वावर खूपच बिनधास्त आहे, त्यामुळे मालिकेमध्ये एकप्रकारचे हलकेफुलके वातावरण तयार होते. दुर्गा कशी कशी वागेल, कुठे काय बोलेल याचा काही नेम नाही. ती कुणालाच घाबरत नाही,या कारणामुळे दुर्गाला आपल्या तालावर नाचवणं विद्युलसाठी कठीण झालं आहे. दुर्गाच्या वाड्यातील काही गंमती जमती तसेच दुर्गाचे विद्युल आणि भुजंग बरोबर उडणारे खटके असो वा मोठ्या मालकांसोबतची छोटी – मोठी भांडणं असो सगळचं प्रेक्षकांनी मोठ्या मनाने स्वीकारलं आहे.
दुर्गा आणि सरस्वतीची भूमिका साकारणारी तितिक्षा तावडे यावर म्हणाली, “सरस्वती मालिका सुरु झाल्यापासून मालिकेमध्ये बऱ्याच प्रकारच्या घटना घडल्या, वेगवेगळी रूपं सरस्वतीने घेतली आहेत. लग्नाआधीची सरस्वती, लग्नानंतरची सरस्वती, मोठ्या मालकांच्या प्रेमात पडलेली, त्यानंतर देविका आल्यानंतरची सरस्वती म्हणा किंवा आताची दुर्गा. दुर्गा जी सरस्वती सारखी दिसते पण तीच वागणं,बोलणं, चालणं आणि पेहेराव सगळच वेगळं आहे. ही भूमिका करणे माझ्यासाठी खरचं खूप मोठं आव्हानं होतं. पणं प्रेक्षकांनी या रुपात मला, माझ्या भूमिकेला देखील स्वीकारलं या बद्दल सगळ्या प्रेक्षकांचे खूप खुप धन्यवाद. असचं माझ्यावर आणि आमच्या मालिकेला प्रेमं करत रहा.”