नविन वर्षाच्या पुर्व संध्येला सलग दहा दिवस
शिर्डीत सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त दिनांक २३ डिसेंबर २०१७ ते दिनांक ०१ जानेवारी २०१८ याकालावधीत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांनी दिली.
डॉ.हावरे म्हणाले, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन साईनगर येथील मैदानावर सायं.७.०० ते रात्रौ ९.३० यावेळेत करण्यात आले असून यामध्ये शनिवार दि.२३ डिसेंबर रोजी श्री.रुपकुमार राठोड व सौ.सुनाली राठोड, मुंबई यांचा साईभजन संध्या कार्यक्रम होणार आहे. रविवार, दिनांक २४ डिसेंबर अशोक हांडे, मुंबई यांचा सुमारे १५० कलाकारांचा समावेश असणारा “मराठी बाणा” हा मराठी संस्कृती व परंपरेचे दर्शन घडविणारा संगीताचा भव्य कार्यक्रम होणार आहे.
तसेच सोमवार दिनांक २५ डिसेंबर रोजी सौ.विशाखा पार्सेकर, मुंबई यांचा साई गितांजली हा कार्यक्रम, मंगळवार दिनांक २६ डिसेंबर रोजी आदीवासी कांबडवने व महिला फुगडी नृत्य मंडळ, शिंगणवाडी (लव्हाळवाडी), ता.अकोले यांचा नृत्य व फुगडी हा कार्यक्रम, बुधवार दिनांक २७ डिसेंबर रोजी श्री चामुंडेश्वरी फुगडी मंडळ, कुडाळ यांचा लोकनृत्य हा कार्यक्रम, गुरुवार दिनांक २८ डिसेंबर रोजी श्री.बादल बात्रा, नागपूर यांचा हिंदी साईभजन हा कार्यक्रम, शुक्रवार दिनांक २९ डिसेंबर रोजी डॉ.भरत जेठवाणी, सप्तरंग चॅरीटेबल ट्रस्ट यांचा लोकनृत्य कार्यकम, शनिवार दिनांक ३० डिसेंबर रोजी श्री.सच्चिदानंद आप्पा, मुंबई यांचा साईभजन हा कार्यक्रम, रविवार दिनांक ३१ डिसेंबर रोजी श्री.विजय साखरकर, मुंबई यांचा साई-स्वर गीत संध्या हा कार्यक्रम व सोमवार दिनांक ०१ जानेवारी २०१८ रोजी श्री.सुखविंदर सिंग व सजदा सिस्टर्स, मुंबई यांचा साईभजन असे विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
दिनांक ३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतानिमित्त रात्रौ ९.३० ते १२.०० यावेळेत श्री.नीरज शर्मा, दिल्ली यांचा साईभजनचा कार्यक्रम साईनगरच्या मैदानावर आयोजित केला असून या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या मेजवानीचा साईभक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.हावरे यांनी केले आहे.
On the eve of NEW YEAR 2018
A huge 10 DAY cultural feast at SHIRDI…
Shirdi-
On behalf of the Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi, a huge 10 day cultural extravaganza will be presented to the Sai devotees visiting Shirdi between 23rd December 2017 and 01st January 2018 on the occasions of bidding a goodbye to the current year and welcome to the NEW YEAR. This information was provided by Dr. Suresh Haware, Chairman, Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.
Dr. Haware said that on this occasion various cultural programs have been organized at the Sainagar Grounds everyday between 7.00 p.m. and 9.30 p.m.On the 23rd December Mr. Rupkumar Rathod and Mrs. Sunali Rathod will present Sai Bhajan Sandhya program. On Sunday 24th December 2017, Ashok Hande, Mumbai will present Marathi Bana program with 150 artists presenting the Marathi culture and traditions.
Mrs Vishakha Parsekar will present Sai Geetanjali program on Monday, the 25th December and on the Tuesday the 26th December the Adivasi Kambadvane and Mahila Phugadi Nritya Mandal, Shinganwadi (Lavhalwadi) Ta. Akole will present Dance and Phugadi program. On the 27th December Shri Chamundeshwari Phugadi Mandal, Kudal will present folk dance program. Mr. Badal Batra, Nagpur will present a Hindi Sai Bhajan program on Thursday the 28thDecember. On Friday the 29th December Dr. Bharat Jethwani and his Saptarang Charitable Trust will present a folk dance program. On Saturday the 30thDecember Shri Sacchidanand Appa, Mumbai will present Sai Bhajan program. On Sunday the 31st December Mr. Vijay Sakharkar, Mumbai will present Sai-Swar Geet Sandhya program. On Monday the 1st January 2018 mr. Sukhvindar Singh and Sajda sisters, Mumbai will present a cultural program Sai Bhajan.
For bidding a goodbye to the current year on the 31st December 2017 and to welcome the NEW YEAR, a program by Mr. Neeraj Sharma, New Delhi titled SAI BHAJAN has been organized between 9.30 pm and 12.00 midnight at the Sainagar grounds.
Dr. Suresh Haware has appealed to the Sai devotees to take advantage of the 10 day cultural feast organized for them.