निर्मलाची चाहूल लवकरच कलर्स मराठीवर

आरव जिंदल निर्मित युफोरिया प्रॉडक्शन्सच्या चाहूल’ मालिकेची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. प्रेक्षकांची उत्कंठा ताणणाऱ्या ‘निर्मला’च्या सत्याचा उलगडा लवकरच यात होणार आहे. एखाद्यावर जीवापाड प्रेम असेल तर ते प्रेम कधी संपत नाही अगदी आयुष्य संपलं तरीही. परदेशात उच्च शिक्षणासाठी गेलेला सर्जेराव भोसलेआपली होणारी बायको जेनीसमवेत मायदेशी भवानीपूरला परततो. जेव्हापासून सर्जेराव घरी आलाय तेव्हापासून अचानकच काही अगम्य गोष्टी घडू लागल्या आहेत. जेनीला सतत होणारे भास.. भोसले कुटुंबावर पसरलेले भीतीचे सावट आणि निर्मलाविषयीच्या रहस्यामुळे सारेच भांबावून गेले होते.  पण आता भयप्रद अनामिक हुरहूर लावणारी ही ‘निर्मला’ लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे.                                      
निर्मला’... ही निर्मला’ नक्की आहे तरी कोण..या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्याची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे. सर्जेरावाची ही बालमैत्रीण अचानक कुठे गायब झालीतिच्या वडिलांनासुद्धा ती नेमकी कुठे आहे हे माहित नसतानाती बबनबरोबर पळून गेल्याच्या वावड्याही गावात ऐकायला मिळतात. नेमकी कोण आहे ही निर्मला’?, जेनीला तिचे भास का होतात?, तिच्या गायब होण्यात सर्जेरावाचा काही संबंध आहे का?, भोसले कुटुंब सर्जेरावापासून काही लपवत तर नाहीतया आणि अशा अनेक प्रश्नांची उकल आपल्याला चाहूलच्या येत्या काही विशेष भागांत पहायला मिळणार आहे.
युफोरिया प्रॉडक्शन्सच्या कलर्स’ मराठीवरील चाहूल’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली आहे. आरव जिंदल आणि विनोद माणिकराव निर्मित चाहूल’ मालिकेला ग्रामीण भागासोबत शहरी भागातदेखील मोठ्या प्रमाणात प्रेक्षकवर्ग लाभला असून निर्मात्यांना प्रेक्षकांकडून सोशल साईट्सवर मोठ्या संख्येने सकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. विनोद माणिकराव दिग्दर्शित चाहूल’ मध्ये निर्मालाचे सत्य कलर्स मराठीवर सोम. ते शनि. रात्री १०.३० वा. पहायला विसरू नका.

Subscribe to receive free email updates: