“सरस्वती” म्हणजेच तितिक्षा तावडेसाठी यावेळेसचा गुढीपाडवा खास !

मुंबई, १५ मार्च २०१८ : कलर्स मराठीवरील सरस्वती ही मालिका सुरु झाल्यापासूनच प्रेक्षकांनी तिला आपलेसे केले. मालिकेमधील मोठ्या मालकांची सरस्वती म्हणजेच तितिक्षा तावडे प्रेक्षकांची मनं कमी कालावधीतच जिंकली. सरस्वती मालिकेमध्ये तितिक्षाने आपल्या अभिनयाच्या वेगवेगळ्या छटा दाखवल्या कधी प्रेमळ, कधी करारी, खंबीर तर कधी डबल रोल करताना दुर्गा बनून तिने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. आता ती मालिकेमध्ये दुर्गांच बनून नकारात्मक भूमिका साकारत आहे. तितिक्षा सोशल मीडियाद्वारे तिच्या आयुष्यातील काही क्षण आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता नुकतेच खुशबूम्हणजेच तिच्या बहिणीचे लग्न संग्राम साळवी बरोबर झाले आणि तीतीक्षाने तिच्या बहिणी बरोबरचे छानसे फोटो देखील शेअर केले.
या वेळेसच्या गुढीपाडवा बद्दल विचारले तेंव्हा ती म्हणाली, “सरस्वती मालिकेमध्ये मला गेल्या वर्षी बरेच काही वेगळे करण्याची संधी मिळाली... पण येत्या वर्षी अजून मेहनत करून अजून काहीतरी वेगळं करण्याची इच्छा नक्कीच आहे. दरवर्षीच गुढीपाडवा खास असतो कारण नव्या वर्षाची सुरुवात असते पण यावेळेसचा गुढीपाडवा खूप खास आहे कारण माझ्या बहिणीच्या आयुष्याची नव्याने सुरुवात झाली आहे. आणि लग्नानंतरचा पहिला गुढीपाडवा आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी नक्कीच काहीतरी स्पेशल आम्ही करू... आणि मला खात्री आहे त्यांना आवडेल”. 

Subscribe to receive free email updates: