१८ व्या संस्कृती कलादर्पण व्यावसायिक नाट्य स्पर्धेचा प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांचा व कलाकृतीचा यथोचित सन्मान करणा-या संस्कृती कलादर्पण पुरस्काराने मनोरंजन विश्वात आपली विशेष मोहोर उमटवली आहे. संस्कृती कलादर्पण संस्थेतर्फे व्यावसायिक नाटकांसाठीची स्पर्धा नुकतीच आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला असून स्पर्धेतील निवडक नाटकांची अंतिम फेरी ७८ व ९ एप्रिल २०१८ रोजी यशवंत नाट्य मंदिरमाटुंगामुंबई येथे आयोजित केली आहे.
या व्यावसायिक नाटय़ स्पर्धेत मुंबई व पुणे येथील एकूण २५ नाट्यसंस्थांनी प्रयोग सादर केले. त्यामध्ये अंतिम फेरीसाठी खालीलप्रमाणे पाच नाटकांची निवड करण्यात आलेली आहे. यात वेलकम जिंदगी (त्रिकूट,मुंबई)संगीत देवबाभळी (भद्रकाली प्रॉडक्शन्स)अनन्या (सुधीर भट थिएटर्स)माकड (श्री स्वामी समर्थ आर्टस)अशीही श्यामची आई (सुधीर भट थिएटर्स) या नाटकांचा समावेश आहे. या विभागासाठी प्राजक्ता कुलकर्णीदिघेप्रकाश निमकर,संजय डहाळेचंद्रशेखर सांडवे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. काही तांत्रिक कारणास्तव या पाच नाटकांपैकी कोणाला नाटकाचा प्रयोग करणे शक्य नसेल तर त्यासाठी परीक्षकांनी फायनल डिसीजन (जाई वल्लरी फॉर यू प्रोडक्शन)स्टॅच्यु ऑफ लिबर्टी (अद्धैत थिएटर) या दोन नाटकांची निवड केली आहे. यापैकी एक नाटक सादर होईल.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या सर्व नाट्य संस्थांचे संस्कृती कलादर्पण संस्थेच्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर आणि अध्यक्ष -संस्थांपक चंद्रशेखर सांडवे यांनी अभिनंदन केले आहे.

Subscribe to receive free email updates: