संगीता सचिन अहिर वरळी कोळीवाड्याचं रूप बदलण्यासाठी प्रयत्नशील Or संगीता सचिन अहिर यांची वरळी कोळीवाड्यात स्वच्छता मोहिम

वरळी कोळीवाड्यातील अस्वच्छतेचं प्रमाण लक्षात घेता मैत्री चॅरिटेबल ट्रस्टच्या संगीता अहिर आणि सचिन अहिर यांनी या कोळीवाड्याचा चेहरामोहरा बदलण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एखाद्या विभागाची बिकट अवस्था लक्षात घेऊन त्याठिकाणी बदल घडवून आणण्यासाठी केवळ भाषणं करण्यापलिकडे जाऊन आपण स्वत: या बदलाचा भाग व्हावं, असा विचार खूप कमी जण करताना दिसतात. याच विचाराच्या सचिन आणि संगीता अहिर यांनी इथल्या स्थानिकांना शाब्दिक प्रोत्साहन देण्यापलिकडे ते स्वत: या स्वच्छता मोहिमेचा भाग झाले आहेत. अ मिसाल च्या रूबल नागी आणि मैत्री चॅरिटेबल ट्रस्ट चे सचिन आणि संगीता अहिर यांच्या पुढाकाराने पार पडलेल्या या स्वच्छता मोहिमेला स्थानिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला.

Subscribe to receive free email updates: