Over 600 athletes from 43 units affiliated with the Indian Body Builders Federation (IBBF) will convene in Pune, with the 11thMr. India Senior Men’s & Women’s Bodybuilding & 6th Men’s & Women’s Physique Sports National Championships scheduled to be held at the Shri Shiv Chatrapati Sports Complex in Balewadi, from March 23 to 25, 2018.
Chetan Pathare, General Secretary of the Indian Body Builders Federation informed that "Athletes from the Government Sports Control Boards along with participants from various states and union territories will be vying for the top honours and a slice of the whopping prize money fund of over Rs.50 lakhs, a figure unprecedented in the history of Body Building and Physique Sports, in India. The Overall Champion - Mr India 2018 will be awarded with the cash award of Rs.7,50,000/- which again is the highest amount so far offered in India".
The likes of Sunit Jadhav, Nitin Mhatre, Sagar Katurde, Akshay Mogarkar, Atul Amre, and Mahendra Chavan- all from Maharashtra- will be strong contenders for the title in Senior Men’s Bodybuilding. Indian Railways will also be fielding a strong contingent, consisting of accomplished athletes like Javed Ali Khan, Ram Niwas, Bhaskaran, Kiran Patil, Sagar Jadhav and Pritam Choughule. Anooj Kumar and T H Dayanand will pose a strong challenge representing services. Other prominent names include Pritam Singh and Ram Tudu of CRPF, C Rahul of Telangana & Anil Gochikkar of Orrisa.
The Senior Women’s Body Building competition consists of the likes of Kanchi Advani (Maharashtra), Sarita Devi(Manipur) and Mamota Devi (Delhi).
The athletes to look out for in the Physique Sports for Men will be Rahul Patankar, Kiran Sathe (Maharashtra). The Model Physique competition for Women is expected to throw up a tough fight between Sanju (UP), Ankita Singh (Karnataka) Stell Goude and Dr Reeta Tari. (Maharashtra). Nishrin Parikh (Maharashtra), competing at the age of 51, represents a remarkable story.
Organised by the Indian Body Builders Federation, the 11th Mr. India Championships will be powered by Optimum Nutrition, with Honda, Viva Fitness, being the Equipment Partner, Talwalkars being the Fitness Partner, Avvatar Sports Nutrition being the Nutritional Partner, and Firstfitt being the Gym Partner, in association with Animal Booster, SAF Fitness and MENCON, Eugenics Nutrition as other sponsors. Mr Deepak Mankar, Ex Deputy mayors is also the sponsor to the event.
Chetan Pathare - General Secretary of the IBBF along with Vikram Rothe, Madan Kadu, Hiral Sheth are taking efforts to make this championship a grand success. It is also supported by Prashant Aapte and Ajay Khanvilar
Marathi Release
शरीरसौष्ठवाच्या कुंभमेळ्यासाठी पुणे सज्ज
देशभरातील 600 बाहुबली पुण्याच्या दिशेने
पुणे, दि.20 (क्री.प्र.)- जे आजवर कधीही घडले नाही, ते करून दाखविण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत. असंख्य अडचणींवर मात करीत येत्या 23 ते 25 मार्चला भारतीय शरीरसौष्ठवाचा कुंभमेळा अर्थातच अकरावी राष्ट्रीय अजिंक्यपद अद्भूत, अद्वितीय, संस्मरणीय, ऐतिहासिकच होणार , असा दृढ विश्र्वास व्यक्त केलाय इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनचे (आयबीबीएफ) सरचिटणीस चेतन पाठारे यांनी. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच 600 च्या आसपास बाहुबली म्हणजेच शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार देहाचे प्रदर्शन करण्याचा विक्रम रचण्यासाठी गुरूवारी पुणे गाठतील. यंदाचा शरीरसौष्ठवाचा सोहळा ग्लॅमरस आणि फाइव्हस्टार करण्याची सर्व तयारी पूर्ण झाल्याचीही माहिती पाठारे यांनी दिली.
केंद्र सरकारच्या क्रीडा खात्याची मान्यता असलेल्या इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशन पुन्हा एकदा शरीरसौष्ठवाच्या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने भारतीय शरीरसौष्ठवाची खरी ताकद अवघ्या विश्वाला दाखवून देणार आहे. भारतीय 41 राज्य आणि संस्थामधील तब्बल 600 खेळाडू आपले सर्वश्रेष्ठ प्रदर्शनासाठी पुण्याच्या दिशेने निघाली आहेत. काही वर्षांपूर्वी संघटनात्मक वादामुळे कमकुवत झालेला हा खेळ आता खऱ्या अर्थाने बलशाली झाला आहे. 600पैकी सुमारे 400 खेळाडू मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत खेळणार आहेत. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेतही खेळाडूंचा आकडा नेहमीपेक्षा जास्त असेल. पण फिजीक स्पोर्टस् प्रकारातही खेळाडूंची संख्या विक्रमी असेल. यात देशभरातील सर्व मुख्य राज्य आणि संस्थांमधील बाहुबली शरीरसौष्ठवपटू पुण्यात खेळणार आहेत. त्यामुळे बालेवाडीत शरीरसौष्ठवाचे युद्ध रंगणार असल्याचे निश्चित झाले आहे.
संघटनेनेच लावली ताकद
पुण्याच्या बालेवाडीत भारत श्री स्पर्धेचे आयोजन म्हणजे आयबीबीएफसाठी फार मोठे आव्हान होते. ते आव्हान चेतन पाठारे यांच्या नेतृत्वाखाली आयबीबीएफने पेलले आहे. खर्चाबाबत कुठेही आ खडता हात न घेता आयबीबीएफने प्रथमच सर्व खेळाडू-पदाधिकाऱ्यांची निवास आणि भोजन व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये केली आहे. आर्थिक संकटांमुळे प्रायोजकांनी पाठ दाखवल्यामुळे भारत श्रीचे आयोजन संकटात सापडले होते तेव्हा शरीरसौष्ठवाचे खरेखुरे संघटकच आयबीबीएफच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. खुद्द व्यायाममहर्षी मधुकर तळवलकरांनी खेळाडूंच्या निवासासाठी फाइव्हस्टार व्यवस्थाच करावी, हा आग्रह धरला आणि तो पूर्णही करून दाखवला. त्यांच्याप्रमाणे ठाण्याचे प्रशांत आपटे आणि मुंबईचे अजय खानविलकर यांनीही भारत श्रीसाठी आपली आर्थिक ताकद आयबीबीएफच्या मागे उभी केली. एवढेच नव्हे तर यांचे सहकार्य पाहून शरीरसौष्ठवाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही स्पर्धेच्या ऐतिहासिक आयोजनासाठी आर्थिक बळ दिल्याची माहिती पाठारे यांनी दिली.
अनंत अडचणीनंतरही राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन हे संस्मरणीयच होणार असून देशभरातून येणाऱया खेळाडूंवर अर्ध कोटी रूपयांच्या रोख बक्षीसांचा वर्षावही होणार. आजवर शरीरसौष्ठवाच्या इतिहासात जे घडले नाही ते आम्ही करून दाखविणार आहोत. 600 पेक्षा अधिक खेळाडू आणि 50 लाखांची रोख बक्षीसे हा एक विक्रमच आहे. शरीरसौष्ठवाची ताकद आणि केझ किती वाढली आहे, याचे रूप पुण्याच्या बालेवाडीत जागोजागी दिसेल, असा विश्वासही पाठारे यांनी बोलून दाखविला. खेळाच्या इतिहासात 600 खेळाडू आणि 400पदाधिकाऱयांची पंचतारांकित निवास आणि भोजन व्यवस्था करणारी आयबीबीएफ ही भारतातील पहिलीच क्रीडा संघटना असावी, असा दावाही पाठारे यांनी केला.
एकापेक्षा एक तगडे खेळाडू
यंदा स्पर्धेत अनेक विक्रम घडणार आहेत. महाराष्ट्राचा सर्वात मोठा संघ भारत श्रीसाठी सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे 44 खेळाडूंच्या संघाने स्पष्ट दिसतेय,पण महाराष्ट्रापुढे आव्हान असेल रेल्वे, सेनादल, पंजाब,उत्तर प्रदेश, तामीळनाडूसारख्या तगड्या संघाचे. भारताचे सर्व स्टार खेळाडू या स्पर्धेसाठी गेले तीन महिने तयारी करीत आहेत. जेव्हा खेळाडूंची नावे सर्वांसमोर येतील ,तेव्हा शरीरसौष्ठव प्रेsमींची छाती अभिमानाने फुगेल. रामनिवास, यतिंदर सिंग, जावेद खानसारखे दिग्गज या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे सलग दोनवेळा भारत श्रीचा मान मिळविणाऱ्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखणे फार आव्हानात्मक असेल, असेही शेवटी पाठारे यांनी सांगितले.