मैत्री आणि कुटुंबाची धम्माल सांगतोय 'फुगे' चा नवा पोस्टर

प्रेम हे आंधळे असते... असे म्हणतात, पण जर हे प्रेम दोन मित्रांमध्ये असेल तर ! प्रेमाची ही हटके बॅकस्टोरी सांगणारा 'फुगे' हा सिनेमा येत्या १० फेब्रुवारी रोजी वेलेन्टाईन डे ची मोठी मेजवानी घेऊन येणार आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे यांच्या फक्कड मैत्रीवर आधारित असलेल्या या सिनेमाची प्रदर्शनापूर्वीच मोठी चर्चा होत आहे. 'फुगे' या हटके नावातच मोठी गम्मत असलेल्या या सिनेमाचा नुकताच दुसरा पोस्टर सोशल साईटवर लॉंच करण्यात आला. याही पोस्टरमध्ये स्वप्नील-सुबोधच्या याराणा ठासून भरलेला दिसून येतो, पण यासोबतच सिनेमातील इतर स्टारकास्ट मंडळीदेखील या पोस्टरमध्ये दिसून येतात. मैत्रीच्या विश्वात रमलेल्या या दोन मित्रांच्या खाजगी आयुष्यात त्यांच्या मैत्रीमुळे झालेल्या सावळागोंधळाची प्रचीती हा पोस्टर पाहताना होतो. या सिनेमात प्रार्थना बेहेरे आणि नीता शेट्टी या अभिनेत्री देखील आहेत, तसेच मोहन जोशी, आनंद इंगळे आणि सुहास जोशी या ज्येष्ठ कलाकरांचा देखील यात समावेश आहे. विशेष म्हणजे हे तिघेही एका वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. 
केवळ स्वप्नील- सुबोध नव्हे तर 'फुगे' च्या संपूर्ण कुटुंबाची धम्माल या पोस्टरमध्ये आपल्याला दिसून येते. थोडक्यात काय तर, 'फुगे' हा कम्प्लीट फेमिली पॅकेज सिनेमा असल्याचे हा पोस्टर सांगतो. इंदरराज कपूर प्रस्तुत तसेच एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हानकार्तिक निशानदारअश्विन आंचन आणि अनुराधा जोशी ह्यांनी ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे. स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित हा चित्रपट रंगीबेरंगी फुग्यांप्रमाणे रसिकांचे मनसोक्त मनोरंजन करेल, यात शंका नाही. 

Subscribe to receive free email updates:

Related Posts :