मराठी चित्रपट सृष्टी मधली ग्लॅमर्स दिवा सई ताम्हणकर गेल्या काही महिन्यांपासून फार चर्चेत आहे मग त्या चर्चेचा कारण तिचे आगामी चित्रपट असो की कुणाच्या तरी पंखांना बळ देण्यासाठी केलेला पाठिंबा. आज पुन्हा एकदा सई चर्चेत आली आहे पण ह्या चर्चे मागील कारण तिने केलेला फेमिना फॅशन नाईट साठी केलेला रॅम्प वॉक आहे. रॅम्प वॉक साठी तिने ऑफ शोल्डर व्हाईट वन पीस गाऊन परिधान केला होता. तो गाऊन शीतल बियाणी यांनी खास सई साठी डीसाइन केला होता. साई त्या गाउन मध्ये एखाद्या परिकथेतील परी पेक्षाही सुंदर दिसत होती.
आजपर्यंत सई ने अनेक भूमिका साकारल्या आहे तिच्या प्रत्येक लुक ने फॅन्स ला अजून दिवाण बनवल आहे पण सई चा व्हाईट गाऊन मध्ये असलेला फोटो पाहून तिचे फॅन्स घायाळ झाले असणार हे नक्की.