“राधा प्रेम रंगी रंगली” मालिकेमध्ये राधाने प्रेमला म्हंटले “रोबो” !


मुंबई, १८ डिसेंबर २०१७ : कलर्स मराठीवरील राधा प्रेम रंगी रंगली मालिकेमध्ये सत्यनारायणाच्या पूजेला राधा आणि प्रेम बसतात. ज्यासाठी राधा प्रेमला सोहळ कसं नेसतात हे सांगतेप्रेमला हया  सगळ्या गोष्टी आवडत नसून देखील तो हे करण्यास तयार होतो. या सगळ्या गोंधळानंतर पूजा निर्विघ्नपणे पार पडते. पूजेनंतर प्रेम आणि दीपिका एका पब मध्ये जातात आणि राधा प्रेमच्या या निर्णयावर काहीच बोलत नाही हे प्रेमच्या आईला म्हणजेच माधुरीला अजिबात पटत नाही. माधुरीला ही गोष्ट न पटल्याने ती राधाला त्या पबमध्ये पाठवते. पण राधाचं पबमध्ये अचानक येणं हे दीपिका आणि प्रेम यांना अजिबात आवडत नाही. प्रेमच्या मनात राधाबद्दल रागतिरस्कार निर्माण होण्यासाठी दीपिका राधाच्या ड्रिंकमध्ये दारू मिक्स करते. राधा या सगळ्याला अनभिज्ञ असल्याकारणाने ती ते ड्रिंक पिते देखील. ड्रिंक घेतल्यानंतर राधाच्या वागण्यात झालेला बदल बघून तिच्यावर प्रेम अजूनचं चीडतो. हा सगळा प्लन दीपिकाच आहे हे माधुरीला कळते आता माधुरी काय करणार कसं प्रेमला दीपिकापासून दूर करणार प्रेम राधाला माफ करणार का प्रेमला मनवण्यासाठी राधा आता काय करणार हे सगळं तुम्हाला मालिकेच्या पुढे येणाऱ्या भागांमध्ये बघायला मिळणार आहे.
मालिकेमध्ये पबच्या स्पेशल भागासाठी राधाचा नवीन लुक प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ज्यामध्ये ती अतिशय सुंदर दिसत असून याबद्दल सोशल मिडीयावर दिखील बरीच चर्चा आहे. या भागामध्ये राधाने खूप सुंदर असा गुलाबी रंगाचा ड्रेस घातला आहे आणि ती या लुकमध्ये खूप सुंदर आणि गोड दिसते आहे. दीपिकाने दिलेले ड्रिंक घेतल्यामुळे राधाला भान नाहीये ती काय बोलते आहेत्यामुळे प्रेम देखील अजून वैतागला आहे. राधा प्रेमला तुम्ही “चावी दिलेल्या खेळण्यातले रोबो” आहात असं म्हणते आणि स्वत:ला “सौ. राधा रोबो देशमुख” हे ऐकून प्रेमला अजूनच राग येतो. पणमज्जेत का होईना राधा प्रेमला खरं काय आहे ते सांगण्याचा प्रयत्न करते आहे. पणया सगळ्या घटनांमुळे प्रेम आता राधाशी बोलणं सोडणार आहे. राधा प्रेमला कशी मनवेल ?माधुरी राधाची या सगळ्यात काय मदत करेल दीपिका राधा आणि प्रेम मध्ये दुरावा टिकून रहावा यासाठी काय प्रयत्न करेल हे बघणे रंजक असणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका “राधा प्रेम रंगी रंगली” सोम ते शनि रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. 

Subscribe to receive free email updates: