शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून दिनांक २४ डिसेंबर व ३१ डिसेंबर २०१७ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणार असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त दिनांक २५ डिसेंबर २०१७ ते दिनांक ०१ जानेवारी २०१८ याकालावधीत शिर्डीत लाखो भाविक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी आपली हजेरी लावतात. याकाळातील संभाव्य गर्दी लक्षात घेवून संस्थानच्या वतीने श्री साईआश्रम, नविन भक्तनिवासस्थान (५०० रुम) व साई धर्मशाळा आदि ठिकाणी सुमारे ३० हजार चौ.फुट बिछायत व कनातीसह कापडी मंडपांची उभारणी करुन अतिरिक्त निवास व्यवस्था करण्यात येणार असून या ठिकाणी चहा, नाष्टा, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे व सुरक्षा आदि व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच सर्व साईभक्तांना लाडू प्रसादचा लाभ मिळावा म्हणून साईनिवास अथितीगृहासमोर व व्दारकामाई मंदिरासमोर नाट्यगृहाजवळ अतिरिक्त लाडू काऊंडर सुरु करण्यात येणार आहे.
साईभक्तांना श्रींच्या दर्शनाचा लाभ सुलभ व्हावा याकरीता दिनांक २४ डिसेंबर व ३१ डिसेंबर २०१७ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे राहणाार असल्याने दिनांक २४ डिसेंबर रोजीची रात्रौ १०.३० वाजता होणारी शेजारती व दिनांक २५ डिसेंबर रोजीची पहाटेची काकड आरती तसेच दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्रौ १०.३० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०१ जानेवारी २०१८ रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
तसेच श्री साईबाबा समाधी शताब्दी महोत्सवाच्या नियोजनासाठी देशातील व परदेशातील साईमंदिरांच्या विश्वस्त, प्रतिनिधींचे व्दितीय जागतिक साईमंदिर विश्वस्त परिषद शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी आयोजित करण्यात आली असून या परिषदेचे उदघाटन मा.उपराष्ट्रपती श्री.व्यंकय्या नायडू यांच्या शुभ हस्ते होणार आहे. मा.उपराष्ट्रपती हे सकाळी साईमंदिरात दर्शनासाठी येणार असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव सकाळी ९.३० ते १०.३० यावेळेत समाधी मंदिर भाविकांकरीता दर्शनासाठी बंद राहणार असल्याचेही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.
Shirdi –
Considering the Christmas vacation, bidding good-bye to current year and welcome to the New Year and resultant huge crowds of Shri Sai devotees expected for Shri Saibaba Darshan during the period, Shri Saibaba Samadhi Mandir will be kept open for the entire night on the 24th December and 31stDecember 2017. The decision was taken on behalf of the Shri Saibaba Sanshan Trust, Shirdi. This information was provided by Shrimati Rubal Agrawal, Chief Executive Officer of the Sansthan.
Shrimati Agrawal said that with the Christmas vacation, good-bye to the current year and welcome to the New Year between 25th December 2017 and 01stJanuary 2018, lakhs of Shri Sai devotees attend Shirdi for darshan of Shri Sai Samadhi.
Considering the expected crowds additional residential accomodation has been organized on behalf of the Sansthan with 500 Rooms at Shri Sai Ashram New Bhakta Niwas and around 3,000 sq. ft cloth Shamiana at Sai Dharmashala and other places. The arrangements for Tea, Snacks, drinking water, Toilets, Security and other facilities will be provided at all these places. In order that all the Sai devotees can receive LADU Prasad, additional LADU Counters will be started in front of Sai Niwas Guest House and near Natya Griha at Dwarakamai Temple.
In order to make it easy for the Sai devotees to have darshan Shri Sai Samadhi Mandir will be kept open for the entire night on the 24th and 31stDecember 2017. Due to this the 10.30 p.m. Shejarti on the 24th December and the early morning Kakad arti on the 25th December as well as 10.30 p.m. Shejarti on the 31st December and the early morning Kakad arti on the 01 January 2018 will not be held.
Similarly the Second Global Sai Temple Trustee Summit of Sai Temples from the country and abroad will be held on the 23rd December 2017 for planning of the Shri Saibaba Samadhi Centenary Celebrations. The Summit conference will be inaugurated at the auspicious hands of Hon Vice President of India Mr. Venkayya Naidu on the 23rd December 2017.
Shrimati Agrawal also said that as Hon Vice President of India will be visiting Shri Sai Mandir for darshan, the Mandir will be closed for Sai devotees from9.30 a.m. to 10.30 a.m. for security reasons.