कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामधील कलाकारांचा आजचा दिवस !


  • बिग बॉसच्या घरामध्ये रंगणार “तुझी माझी जोडी” चा खेळ
  • कोण होणार घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट ?
  • कोण बाजी मारणार “तुझी माझी जोडी” कार्यामध्ये ?
मुंबई ३० एप्रिल२०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉसच्या घरामध्ये विनीतच्या एलिमनेशनंतर त्याला एक विशेष अधिकार मिळाला ज्यानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्याच्या घरातून घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करू शकतो आणि विनीतने अनिल थत्ते यांना नॉमिनेट केले आहे. आता येत्या आठवड्यामध्ये अनिल थत्तें बरोबर कोण नॉमिनेट होईल प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल आणि कोण घराबाहेर जाईल हे बघणे रंजक असणार आहे. आजचा दिवस तसा शांतते मध्ये सुरु होणार असून रेशम आणि सई मध्ये सगळं काही ठीक होत आहे असं दिसणार आहे. घर म्हंटलं कि, भांडण होणार, कधी मत जुळणार तर कधी मतभेद होणारहे सगळ सुरु रहाणारच.
आज बिग बॉस घरातील रहिवाश्यांना एक कार्य देणार आहेत. एक से भले दो असं म्हंटल जातं त्यामुळेच जगात जोडीचं अनन्य साधारण महत्व आहे. बिग बॉसच्या घरामध्ये लाडी – गोडीने तर कधी चकमकींमुळे निरनिराळ्या जोड्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. बिग बॉस आज घरातील सदस्यांना “तुझी माझी जोडी”  हे कार्य देणार आहेत. ज्या कार्याच्या अंतर्गत नव्या जोड्यांचे ज्वलंत समीकरण कसं जुळते हे बघण्यासारखे ठरेल यात वाद नाही.
तसेच कार्याचा नॉमिनेशन प्रक्रीये वर देखील परिणाम होणार असून हे बघणे रंजक असणार आहे किएकमेकांमधील मतभेद विसरून कश्या या नव्या जोड्या हे कार्य पार पाडतील कोण होईल नॉमिनेट ? तेंव्हा बघयला विसरू नका आज बिग बॉस मराठी रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.  

Subscribe to receive free email updates:

Related Posts :