पुणे येथील संवादतर्फे मंगळवार दिनांक १ मे ते शुक्रवार दिनांक ४ मे २०१८ या कालावधीत ' संवाद मराठी चित्रपटांचा' हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मराठी चित्रपटांशी संबंधित विविध विषयांवरील परिसंवाद, मराठी चित्रपटांतील दिग्गजांच्यामुलाखती, छायाचित्र प्रदर्शन आणि मराठी चित्रपट सृष्टीतील विविध प्रश्नांवर प्रकाश टाकणारी चर्चासत्रे यामध्ये होणार आहेत.
भारतामध्ये चलचित्रांचा आरंभ करणाऱ्या दादासाहेब फाळके यांनी ३ मे १९१३ रोजी 'राजा हरिश्चंद्र' हा संपूर्ण भारतीय बनावटीचा पहिला मूकपट प्रदर्शित केला आणि ते भारतीय चित्रपटाचे जनक ठरले. दादासाहेब फाळके आणि त्यांचा पहिल्या चित्रपटाच्या स्मरणार्थ ३ मे हा दिवस देशात प्रथमच कला दिवस म्हणून साजरा करण्यात येत असून या निमित्त संवाद पुणे, कावरे आईस्क्रीम आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा पुणे यांच्यातर्फे 'संवाद मराठी चित्रपटांचा' हे मराठी चित्रपट संमेलन आयोजित करण्यात आले असून हे संमेलन रसिकांसाठी विनामूल्य खुले आहे. अशी माहिती संवाद पुणेचे प्रमुख सुनील महाजन आणि कावरे आईस्क्रीमचे संचालक राजूशेठ कावरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, नृत्य दिग्दर्शिका आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे संचालक निकिता मोघे, रघुनाथ कुचीक, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर, आशय फिल्म क्लबचे वीरेंद्र चित्राव, सतीश जकातदार आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना सुनील महाजन म्हणाले की, “या संमेलनात अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापिठाचे कुलपती डॉ.पी.डी. पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थान समिती सदस्य राजेश पांडे, वीरेंद्र चित्राव, डॉ. संजय चोरडिया, रघुनाथ येमूल गुरुजी, सचिन ईटकर, राज काझी, राघुनाथ कुचीक, विशाल चोरडिया, सतीश जकातदार, भारत देसडला, सुरेश कोते, योगेश रिसवडकर, डॉ. विजय थोरात आणि कृष्णकुमार गोयल यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.”
दादासाहेब फाळके आणि त्यांचा पहिल्या चित्रपटाच्या स्मरणार्थ ३ मे दिवस दरवर्षी कला दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या संमेलनाचे सर्व कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिर आणि बालगंधर्व कलादालनात होणार आहे.
संमेलनाचा कार्यक्रम
मंगळवार १ मे, दु. १.०० वा.
साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते छायाचित्र प्रदर्शनाचे उदघाटन.
मंगळवार १ मे, २.०० वा.
रसास्वाद - अनुबोध पटांचा रसास्वाद
वक्ते - समर नखाते, श्यामला वनारसे
बुधवार २ मे, सायं. ५.३० वा.
चित्रकर्मी कुटुंबाचा सत्कार.
चंद्रशेखर पुसाळकर (फाळके), अनिल तोरणे, अनंतराव पेंटर, किशोर सरपोतदार
अध्यक्ष - कीर्ती शिलेदार
प्रमुख उपस्थिती - सुमित्रा भावे
बुधवार २ मे, रात्रौ ९.०० वा.
लावण्यरंग - नृत्य कार्यक्रम
उपस्थिती - लीला गांधी, सुषमा शिरोमणी, आशा काळे, सुरेखा पुणेकर
गुरुवार ३ मे, स. १०.३० वा.
परिसंवाद - बदलता मराठी चित्रपट
सहभाग - गजेंद्र अहिरे, वर्षा उसगांवकर, अरुणा अंतरकर, दिलीप ठाकूर, मृणाल कुलकर्णी
सूत्रसंचालन - राज काझी
गुरुवार ३ मे, दु. १.०० वा.
विक्रम गोखलेंची मुलाखत
मुलाखतकार - राजेश दामले
दृक् श्राव्य कार्यक्रमांत -
विजय मेहता, नीना कुलकर्णी, शरद पोंक्षे इ.
गुरुवार ३ मे, दु. ३.०० वा.
कलात्मक चित्रपट जोपासणाऱ्या फिल्म सोसायटी चळवळीचे योगदान
वक्ते - सुधीर नांदगांवकर, सतीश जकातदार, दिलीप बापट, दिनकर गांगल, संतोष पाठारे
सूत्रसंचालन - वीरेंद्र चित्राव
गुरुवार ३ मे, सायं. ५.३० वा.
राजदत्त जीवन गौरव पुरस्कार आणि
किरण व्ही. शांताराम, विक्रम गोखले यांचा सत्कार
शुक्रवार ४ मे, स. ११.३० वा.
परिसंवाद - चित्रपट समीक्षा आस्वाद की जाहिरात
सहभाग - अमोल परचुरे, श्रीपाद ब्रह्मे, प्रसाद नामजोशी, अशोक राणे इ.
शनिवार ५ व रविवार ६ मे २०१८
वेळ - स. ९ ते रात्रौ ९
स्थान - फिल्म आर्काइव्ह थिएटर
शनिवार ५ मे
ब्रम्हचारी - स. १०.०० वा.
मानिनी - दु. १.०० वा.
जोगवा - ४.०० वा.
रविवार ६ मे
सिंहासन - स. ९.०० वा.
बनगरवाडी - दु. १२.०० वा.
दुनियादारी - दु. ३.०० वा.
नटरंग - सायं. ६.०० वा.