मराठी फिल्म डाटा.कॉम वेबसाईटला दोन लाखांवर फॉलोअर्स

मराठी चित्रपटाचा इतिहासवर्तमान व भविष्य याचा सातत्याने वेध घेणार्‍या 'मराठी फिल्म डाटा. कॉमया वेबसाईटला अवघ्या सोळा महिन्यातच दोन लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्सचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दररोज त्याचा वाचक वर्ग वाढत आहेत. व्ही. शांताराम फाऊंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. किरण शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली  ही साईट कार्यरत आहे. marathifilmdata.com या वेबसाईटची तांत्रिक बाजू सुशांत तावडे सांभाळत आहेत. 
marathifilmdata.com या वेबसाईटवर मराठी चित्रपटविषयक विविध प्रकारची माहिती व छायाचित्रे उपलब्ध आहेत. ८६ वर्षांतील मराठी चित्रपटांची सूची हे या वेबसाईटचे विशेष आकर्षण आहे. मराठी चित्रपट क्षेत्रातील ताज्या घडामोडीकलाकारांची प्रगतीनवीन चित्रपटाचे टीझर / ट्रेलर,  विविध स्तरावरील पुरस्कारांची नोंदअतिथी कट्टा (विविध निमित्ताने कलाकार व तंत्रज्ञ यांचे  मनोगत)  चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांची जन्मतिथी आणि मृत्यू दिनाची दखलप्रासंगिक लेख  इत्यादींचा समावेश आहे. लवकरच यामध्ये उदयोन्मुख कलाकारांचा व्हिडिओ देखील पहायला मिळेल. या जोडीला राजकमल मराठी युट्यूब वाहिनीएमएफडी (Marathi Film Data - MFD) वाहिनी व एमएफडी (Marathi Film Data - MFD)फेसबुक पेज यांचाही समावेश आहे. या वेबसाईटवर वाचकांची पत्रे व प्रतिक्रिया  यांना देखील  सातत्याने स्थान देण्यात आलेले आहे.

Subscribe to receive free email updates: