मुंबई २९ एप्रिल, २०१८ : कलर्स मराठीवरील बिग बॉस हा कार्यक्रम सुरु झाल्यापासूनच बिग बॉसच्या घरातील सदस्यांमधील काही नावे बरीच चर्चेत आहेत, त्यातलचं एक नावं म्हणजे विनीत भोंडे. विनीत भोंडे त्याच्या प्रत्येक वेळेला बिग बॉसकडे जाऊन छोट्या – छोट्या गोष्टींची मागणी करणे, कॅप्टन असताना सारखी टीम मीटिंग आयोजित करणे, मुद्दा सांगण्यात स्पष्टता नसणे, कॅप्टन असताना वा नसताना माईक विसरणे, घरामध्ये झोपणे जे बिग बॉसच्या घरात अमान्य आहे यामुळे चर्चेत राहिला. विनीतला घराबाहेर पडण्याआधी बिग बॉसने माईक विसरण्याच्या सवईमुळे एक शिक्षा देखील दिली. पण, हे सगळं जरी असले तरी सुध्दा घरातील काही सदस्यांना विनीत आवडायचा त्याची लोकप्रियता अल्पावधीतच वाढली होती, तो प्रेक्षकांबरोबर घरच्यांचे देखील मनोरंजन करत होता. परंतु, या आठवड्यामध्ये त्याला पुरेशी मतं न मिळाल्यामुळे घराबाहेर जावे लागले.
घराला घरपण हे घरातील सदस्यांमुळेच असते. आता बिग बॉसच्या घरातून एक एककरून सदस्य घराबाहेर पडू लागले आहेत त्यामुळे वाईट तर वाटणारच पण हा खेळ असाच सुरु राहणार आहे. कार्यक्रमाच्या फॉर्मेटनुसार कोणी एक सदस्य दर आठवड्याला घरामधून बाहेर जाणार हे निश्चित आणि या बद्दलची कल्पना प्रत्येक सदस्याला आहे. म्हणूनच या प्रक्रियेतून आपल्या आवडत्या स्पर्धकाला वाचविण्यासाठी प्रेक्षकांनी भरपूर मत दिली पण ज्या सदस्याला कमी मत मिळाली त्याला या घरामधून बाहेर पडणे अनिवार्य होते. त्यामुळेच विनीतला घराबाहेर जावे लागले. विनीतच्या घराबाहेर जाण्याने सगळ्यांनाच खूपच दु:ख झाले.
विनीत एलीमनेट झाल्यानंतर त्याला एक विशेष अधिकार मिळाला ज्यानुसार तो कोणत्याही एका स्पर्धकाला पुढच्या आठवड्याच्या घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट करू शकतो आणि विनीतने अनिल थत्ते यांना नॉमिनेट केले आहे. आता येत्या आठवड्यामध्ये अनिल थत्तें बरोबर कोण नॉमिनेट होईल ? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल ? आणि कोण घराबाहेर जाईल ? हे बघणे रंजक असणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी सोम ते शनि रात्री ९.३० वा आणि रवी रात्री ९.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.