धर्मेश पुन्हा एकदा MADच्या मंचावर ...
मुंबई, ३ एप्रिल, २०१७ : 2 MADच्या मंचावर या आठवड्यात रेमो आणि धर्मेश यांनी हजेरी लावली. त्यांनी top 8 स्पर्धकांसोबत बरीच धम्माल मस्ती केली. स्पर्धकांनी आपल्या नृत्याची झलक दाखवून रेमो सरांना थक्क केले. या कार्यक्रमातील स्पर्धकांचे नृत्य, त्यांच्यामध्ये असलेला नृत्याबद्द्लचाMADness, उत्साह, बघून रेमो आणि धर्मेश यांना देखील कार्यक्रमामध्ये स्पर्धकांसोबत डान्स करण्यास भाग पाडले. 2 MAD – महाराष्ट्राचा अस्सल डान्सरचा रेमो आणि धर्मेश विशेष भाग तुम्हाला बघायला मिळणार आहे येत्या ३ आणि ४ एप्रिलला रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
या भागामध्ये प्रेक्षकांना एका पेक्षा एक अप्रतिम डान्स बघायला मिळणार आहेत. तुषारने बत्तमिज दिल या गाण्यावर अफलातून नृत्य सादर करून रेमोचे मन जिंकले. तुषार तसेच इतर स्पर्धांसोबत रेमोने या गाण्यावर दोन स्टेप केल्या तर सोनल हिनेदेखील रेमोनेच नृत्यदिग्दर्शकन केलेल्या पिंगा या गाण्यावर नृत्य सादर केले, या गाण्याच्या नृत्यदिग्दर्शनासाठी रेमोला नॅशनल अवॉर्ड मिळाले आहे हे आपल्या सगळ्यांच माहिती आहे. रेमोने तिच्यासोबत मंचावर येऊन या गाण्यावर दोन स्टेप खास प्रेक्षकांसाठी सादर केल्या. प्रतीक्षा हिने येऊ कशी प्रिया ह्या गाण्यावर कॅब्रे केला तर पलकने अगदीच तिच्याहून वेगळीनृत्यशैली वापरत रखुमाई या गाण्यावर नृत्य सादर केले, तसेच राहुलने पॉपपिंग केले.