साउंड आयडियाझ अँकेडमीत साजरी होणार पदवीधरांचा दीक्षांत समारोह


प्रख्यात गायक बप्पी लेहरी व सोनू निगम,प्रख्यात मराठी म्युजिक डायरेक्टर अजय-अतुलबॉलीवूडचे प्रसिद्ध म्युजिक डायरेक्टर प्यारेलाल आणि बरेच दिग्गजांची हजेरी
दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता.
मुंबई १२ डिसेंबर २०१७ - दीक्षांत समारोह हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या युष्यातील महत्वाचा आणि स्मृतीत राहणारा असा क्षण असतोपदवीदा सोहळा म्हणजेदुःख आणि आनंदाचे अनोखे मिश्रण असतेआनंद यासाठी कि आपल्या कष्टाचं फळं आपल्याला पदवी रूपाने प्राप्त होते आणि आपण व्यासायिक आयुष्याचीसुरवात करण्यासाठी सज्ज होतो जेथू आपल्याला यशाची शिखरे खुणावत असतातदुःख यासाठी कि संस्थेशी आपले भावनिक नाती जुळतात , शिक्षकसहकारीयाना आपण दुरावणार असतोकाहीही असले तरी असे क्षण आठवणींचा अक्षय ठेवा म्हणून आपल्याला पुढील आयुष्याला सामोरे जाताना दिलासा देतात.  असेच काही क्षण दिनांक १४ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता साउंड आयडियाझ अकादमी साजरे होणार आहेत.
या कार्यक्रमात प्रख्यात गायक बप्पी लहिरी व सोनू निगम,प्रख्यात संगीत दिग्दर्शक डायरेक्टर अजय-अतुल,बॉलीवूडचे प्रसिद्ध म्युजिक डायरेक्टर प्यारेलालजीसुरेन अकोलकरअविनाश ओंकआणि फास्टर फेणे चे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार व अभिनेता अमेय वाघ उपस्थित असणार आहे. 
या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार श्री. अविनाश ओक यांना प्रदान करण्यात येणार आहे. अविनाश यांनी एफटीआयआय पुणे (१९७३) येथून ध्वनि अभियांत्रिकीमध्ये विशेष स्पेशलायझेशन केले व ते यात सुवर्णपदक विजेता आहेत. त्यांचा रेकॉर्डिंग विषयीचा अनुभव अफाट आहे व शास्त्रीयगझलइंडी-पॉपटीव्ही व रेडिओ इव्हॅल्यूशन्स अश्या सर्व प्रकारच्या गाण्यांचे रेकॉर्डिंग ओंक यांनी केले आहे. साउंड आयडियाझ अकादमी ते विशेष फॅकल्टी आहेत.
साउंडआयडियाझ अँकेडमी बद्दल 
अंधेरी पश्चिमस्थित साउंड आयडियाझ अकादमीची स्थापना २०१० मध्ये श्री.प्रमोद चांदोरकर यांनी केली होती. डिप्लोमा इन साउंड इंजिनीअरिंगम्युजिक थेरीडिप्लोमा इन लाइव्ह साउंड आणि अजून साउंड संबंधित प्रशिक्षण साउंआयडियाझ अँकेडमी दिले जाते. अकादमीतील सर्व सदस्य अनुभवी असून त्यांना त्यांच्या क्षेत्रातील ज्ञान आणि कौशल्य आहेत.

Subscribe to receive free email updates: