झी युवावर सोमवारी आणि मंगळवारी दाखवण्यात येणारी गुलमोहर ही मालिका लोकप्रिय होत आहे. एक गोष्टीचे केवळ दोन भागात चित्रीकरण करून वेगवेगळ्या हृदयस्पर्शी कथा सांगणारी गुलमोहर ही मालिका सध्या सगळ्यांचीच आवडती झाली आहे.५ आणि ६ मार्च ला संध्याकाळी ९:३० वाजता ‘' गुलमोहर' या मालिकेत, सर्वांची आवडती अभिनेत्री सायली संजीव आणि आणि अतिशय डॅशिंग असा अभिनेता संग्राम साळवी हे दोघें त्यांची प्रेमकथा घेऊन येत आहेत. मराठी आणि गुजराती खाद्य संस्कृतीची ओळख, त्यावर सुरु असणारा कुटुंबाचा धंदा आणि त्यातून घडणारे प्रेम या कथेतून प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
युवराज, ज्याचे वडील वर्षोनवर्षे महाराष्ट्राची ओळख असलेला वडापाव चा धंदा करत असतात, तर या धंद्याला चॅलेंज देण्यासाठी गुजराथ ची खांडवी घेऊन सेजल येते आणि त्यानंतर सुरु होते एकमेकांचा धंदा बंद करण्याची चढाओढ. एकमेकांचा धंदा बंद करण्यासाठी सुरु असलेल्या या स्पर्धेत अनेक मजेशीर घटना घडतात. दोन भिन्न संस्कृतीचे खाद्य पदार्थ, बनवण्याची प्रक्रिया, लोकांच्या आवडीनिवडी यामुळे ही कथा रुचकर ठरते. हे सर्व सुरु असतांना, एका क्षणाला त्या दोघांच्या लक्षात येते की दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडलेले आहेत. आता धंदा कि प्रेम या व्दिस्तीथीत अडकलेल्या या दोघांची कथा म्हणजे वडापाव वेड्स खांडवी!!
सायली संजीव ला या मालिकेबद्दल विचारले असता ती म्हणाली, "मराठी नंतर बिहारी आणि आता गुजराथी या तिन्ही भूमिका साकारताना तशी मला खूप मजा आली. मुंबई सारख्या शहरात सगळ्याच संस्कृती एकमेकांशी अतिशय प्रेमाने राहतात. माझ्या कॉलनी मध्ये अनेक गुजराथी कुटुंब असल्यामुळे मला शब्दांची चांगली ओळख होती. त्यामुळे ही भूमिका करणे मला अतिशय सोपे गेले. ही माझी दुसरीच मालिका असल्यामुळे गुलमोहर माझे विशेष प्रेमाचे आहे. या नवीन फॉरमॅट मध्ये मंदार देवस्थळी सारख्या दिग्गज दिग्दर्शकाबरोबर काम करण्याचा अनुभव अतिशय सुंदर होता.