प्रयोगोत्सव २०१८मध्ये झी युवाच्या कलाकारांची हजेरी

झी युवा या वाहिनीने नेहमीच उभरत्या कलाकारांना तसेच त्यांना घडवणाऱ्या माध्यमांना पाठिंबा दिला आहे.  रंगभूमी आणि एकांकिकांमध्ये महत्वाचे योगदान असणाऱ्याप्रयोगोत्सव २०१८ च्या दुसऱ्या पर्वात झी युवाने देखील मोलाचा वाटा उचलला तसेच झी युवाच्या कलाकारांनी देखील या कार्यक्रमाला हजेरी लावलीझी युवा या'प्रयोगोत्सव २०१८साठी चॅनल पार्टनर म्हणून कार्यरत आहे.
बऱ्याचदा काही कारणास्तव कित्येक प्रेक्षकांनाकलाकारांना तसेच दिग्गजांना एकांकिकांच्या प्रयोगाला मुकावं लागतंत्यामुळे त्यांच्यासाठी या प्रयोगोत्सवात २०१७ आणि२०१८ मधील  निवडक सर्वोत्कृष्ट एकांकिका सादर करण्यात आल्यामागील वर्षातील काही दर्जेदार एकांकिकांच्या प्रयोगांचा उत्सव म्हणजेच 'प्रयोगोत्सव'.  प्रयोगोत्सव२०१८ मुंबईतील रविंद्र नाट्यमंदीर येथे सादर केला गेला.
शुभ यात्रामाणसंपॉजडॉल्बी - वाजलं की धडधडतंयसॉरी परांजपेमॅट्रिक आणि निर्वासित या  एकांकिका यावेळी प्रयोगोत्सवामध्ये सादर करण्यात आल्यायाप्रयोगोत्सवाची रंगत वाढवण्यासाठी ऑफिशियल पार्टनर असलेल्या झी युवावरील लोकप्रिय कलाकार या एकांकिका पहायला आले होतेअंजली मधील हर्षद अतकरी आणिभक्ती देसाईफुलपाखरू मधील ऋतुजा धारप आणि ओंकार राऊतदेवाशप्पथ मधील कौमुदी वालोलकरअमृता देशमुखसीमा देशमुख आणि विद्याधर (बाप्पाजोशीआणि बापमाणूस मधील सुयश टिळकपल्लवी पाटीलश्रुती अत्रे आणि दिग्दर्शक भीमराव मुडे त्यांच्या उपस्थितीने समारंभाला शोभा आणली होती

एकूण काय तर प्रयोगोत्सव २०१८ अतिशय यशस्वी झाला आणि त्यासाठी झी युवाच्या कलाकारांनी या एकांकिकांचा मनसोक्त आनंद लुटला.

Subscribe to receive free email updates: