दर्जेदार आणि कल्पक तरुणाईला नवं व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या हेतूने मराठी संगीत विश्वात पाऊल टाकतयुवती म्युझिक या संगीत कंपनीने बावरी साद या गाण्याची प्रथम निर्मिती करून रसिकांना तृप्त केले. त्यानंतरत्यांनी हे भवानी या गीताला वेगळ्या धर्तीवर सादर करून रसिकांची वाहवा मिळावीत लोकप्रियतेचे शिखर गाठण्याससुरुवात केली आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धमाल उडवत आहे. पहिल्या तीन दिवसात या व्हिडिओचे ७५हजार वीव्ह झाले तर ७ व्या दिवशी या गाण्याने १ लाख ६० हजारच टप्पा पार केला आहे. तसेच फेसाबुकावर लाखोंच्याघरात लाईक्स मिळत आहेत. 'हे भवानी' गाण्याने तरुणाई सोबतच सर्व वयोगटातील मोहिनी घातली असूनलग्नसरातील वरातींमध्ये हे गाणे वाजू लागले आहे.
'हे भवानी' ह्या व्हिडिओत 'पंजाबी' आणि मराठी कुटुंबाची कथा असून 'पंजाबी' तरुणीचा मराठी तरुणासोबत प्रेमविवाह होतो, आपआपल्या संस्कृतींचा सन्मान राखत मुलांच्या सुखासाठी हि दोन्ही कुटुंब एक होतात. आपल्यालेकीच्या नव्या घरी आयोजित केलेल्या मराठमोळ्या गोंधळाच्या कार्यक्रमाला मुलीचे आई- बाबा, भाऊ - वाहिनीआणि इतर सदस्य उपस्थित राहतात. आपल्या मुलीच्या सुखासाठी देवीच्या गोंधळात हसत खेळत हे सर्व कुटुंबसहभागी होते आणि प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याच्या नात्याने बांधली जातात, एकरूप होतात. या दोन प्रेमी युगलाच्याप्रेमाचे आणि दोन भीन्न संस्कृतींच्या मिलाफाचे चित्रण हा म्युझिक व्हिडिओ करतो.
गीतकार शलाका देशपांडे यांनी या गाण्यासाठी मराठी - हिंदी शब्दांचं फ्युजन करून सुरेख गीतरचना केली आहे. यागाण्याला नीतेश मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्यांनी या गाण्यासाठी अनोखी चाल तयार करून आकर्षक सुरावटतयार केली आहे. आजच्या तरुणाईवर अधिराज्य गाजविणाऱ्या आदर्श शिंदेच्या जादुई पहाडी आवाजाची जोडमिळाल्याने 'हे भवानी' गाण्याची गोडी अधिकच मधुर आणि श्रवणीय झाली आहे.
या म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन आजचे आघाडीचे जनसंपर्क प्रमुख राम कोंडीलकर यांनी केलं आहे. गेल्या दोनदशकांहून अधिक काळ ते चित्रपटसृष्टीत जनसंपर्काचं काम पाहत असून शेकडो दर्जेदार चित्रपटांसाठी कौशल्यपूर्णप्रसिद्धी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. 'हे भवानी' द्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण करून वेगळ्या स्टाईलचं हे गीतरसिक - तरुणांमध्ये कुतूहल वाढवीत असून 'युवती म्युझिक'च्या नावाला साजेसं ठरलं आहे.
या गीताची सिनेमॅटोग्राफी प्रसिद्ध डीओपी क्रिष्णा सोरेन यांनी केली आहे. आजचे आघाडीचे कोरिओग्राफर विठ्ठलपाटील यांनी अप्रतिम कोरिओग्राफी केली असून क्रिएटिव्ह डिरेक्टर सचिन डगवाले आहेत. संकलन पंकज सपकाळेयांचे असून रंगसंगती निलेश पोटे यांनी जुळविली आहे.
'हे भवानी'मध्ये आजचा आघाडीचा नायक भूषण पाटील, तानिया कालरा यांची प्रमुख भूमिका असून तानियाचे मराठी पडद्यावर प्रथम पदार्पण होत आहे. भूषण पाटील सोबत तिची विशेष भूमिका आहे. इतर प्रमुख कलाकारांमध्येसोनिया गौतम, रजनीताई वैद्य, वंदना मराठे, सुधांशु पाठक, हरप्रीत एस बांगा, समरजितसिंग, वैशाली नाईकइत्यादी कलाकारांच्या विशेष भूमिका आहेत.