फक्त मराठीवर ‘कुंग फू मास्टर्स ऑफ झोडियाक सिरीज’ ची धमाल


वेगवेगळ्या जॅानरचे चित्रपट व विविध विषयांवरचे चित्रपट महोत्सवहे फक्त मराठी वाहिनीचं एक ठळक वैशिष्ट्य म्हणावं लागेल. अनेक अॅनिमेशनपट आवर्जून पाहावेत असेच आहेत पण खास घेऊन पाहावेत अशा अॅनिमेशनपटांची नावेही तितकीच मोठी आहेत. स्वत:तले सामर्थ्य शोधून सुपरहिरोसारखा लौकिक मिळवणाऱ्या कुंग फू मास्टर्स ऑफ झोडियाक सिरीज’ ही त्यातलीच एक. या सिरीजची आगळी भेट फक्त मराठी वाहिनीने आपल्या प्रेक्षकांसाठी आणली आहे. कुंग फू मास्टर्स ऑफ झोडियाक सिरीज(Kung Fu Masters Of Zodiac Series) धमाल मेजवानी शनिवार ३० सप्टेंबरपासून सुरु झाली आहे.
अॅक्शनधमाल मनोरंजन यांचा दुहेरी संगम असणाऱ्या कुंग फू मास्टर्स ऑफ झोडियाक’ या ओरिजिनल सिरीजचा आस्वाद दररोज सायंकाळी ६.३० वा. घेता येईल. या सिरीज विषयी बोलताना फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर म्हणाले कीआवर्जून पहावेत अशा अनेक चांगल्या कलाकृतींचा खजिना आपल्याकडे आहे. आमच्या प्रेक्षकांना ओरिजिनल कलाकृतीचा आस्वाद घ्यायला मिळावा या उद्देशाने कुंग फू मास्टर्स ऑफ झोडियाकची इंग्लिश भाषेतील ओरिजिनल सिरीज आम्ही आणली असून ही सिरीज प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.  

Subscribe to receive free email updates: