३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला’ प्रेक्षकांच्या भेटीला

विषयातील आणि मांडणीतील वेगळेपण हे आजच्या मराठी चित्रपटांचे वैशिष्टय़ ठरत आहे. संख्य स्वप्नं घेऊन जगणाऱ्या आणि रोजच्या जगण्याशी दोन हात करणाऱ्या एका अवलियाची गोष्ट रंजकपणे मांडणारा ‘Thank U विठ्ठला  हा मराठी चित्रपट येत्या ३ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.जगण्याचा अर्थ उलगडून सांगणारा ‘Thank U विठ्ठला  हा चित्रपट एम.जी.के प्रोडक्शनची प्रस्तुती असून या चित्रपटाची निर्मिती गोवर्धन काळेगौरव काळे व अंजली सिंग यांनी केली आहे. कथा व दिग्दर्शन देवेंद्र जाधव यांचे आहे. 
एखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवलेतर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतोही या चित्रपटाची मध्यवर्तीसंकल्पना आहे. प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखं आयुष्य आपल्या वाट्याला नाहीयाबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेलं सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेलं आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतोयाची रंजक कथा या चित्रपटात पहाता येईल.
या चित्रपटात निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर चक्क पंढरपूरनिवासी श्री विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहेत. या दोघांसोबत  दीपक शिर्केकमलेश सावंतस्मिता शेवाळेसुनील गोडबोलेप्रदीप पटवर्धनकिशोर चौघुलेजयवंत वाडकरयोगेश शिरसाटअभिजीत चव्हाणमौसमी तोंडवळकरपूर्वी भावेतेजा देवकरयाकुब सय्यदअरुण घाडीगावकरअरुण टकले,संतोष केवडेमिलिंद सफईसतीश सलागरेसंग्राम सरदेशमुखराजेंद्र जाधवशैलेश पितांबरेअंतून घोडकेआनंद जोशीअमीर शेखमनीषा राऊतशिवा व बालकलाकार वरद यांच्या भूमिका आहेत.
सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदेदीपक कांबळी, मच्छींद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या यातील गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्टदमदार संगीत असलेल्या ‘Thank U विठ्ठला या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. झी म्युझिक कंपनीने ‘Thank U विठ्ठला चित्रपटातील गाणी प्रकाशित केली आहेत.
चित्रपटाचे सहनिर्माते एम.सलीम असून पटकथा ही त्यांचीच आहे. संवाद एम.सलीम व योगेश शिरसाट यांचे आहेत. छायांकन दिनेश सिंग तर संकलन अजय नाईक यांचं आहे. कलादिग्दर्शन अनिल गुंजाळ यांनी केलं असून वेशभूषा लक्ष्मण गोल्लार यांची आहे. ग्राफिक्स अरविंद हतनुरकर यांचं तर साऊंड इंजिनिअर विजय भोपे आहेत. नृत्यदिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी आहेत.
३ नोव्हेंबरला ‘Thank U विठ्ठला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

Subscribe to receive free email updates: