“तुम्हे याद करते करते” मध्ये.. स्वर्गीय दत्ता डावजेकर यांच्याजन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आढावा!

दादासाहेब फाळके स्मृती प्रतिष्टान व स्वरमुग्धा आर्टस् यांच्या संयुंक्त विद्यमाने दरवर्षी विविध संगीतमय उपक्रमांचे आयोजन केले जाते. २०१६ - २०१७ हे संगीतकार दत्ता डावजेकर यांचे जन्मशताब्दी वर्ष. या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या अजरामर अवीट गोडीच्या लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाने करून त्यांचे स्मरण करावे म्हणून स्वरमुग्धा आर्ट्सचे प्रा. कृष्णकुमार गावंड आणि दादासाहेबप्रतिष्ठानच्या चंद्रशेखर पुसाळकर, श्रीकांत कुलकर्णी, आदित्य खेर यांनी पुढाकार घेत या जन्मशताब्दी वर्षाचा सांगता सोहळा येत्या ११ नोव्हेंबर २०१७ रोजीशिवाजीनाट्यमंदीर येथे रात्रौ ८.०० वाजता, तुम्हे याद करते करते’ ह्या विशेष संगीत मैफिलीने केला जाणार आहे.  
संगीतकार दत्ता डावजेकर उर्फ "डीडी" यांच्या सांगीतिक कारकीर्दीचा आढावा घेणाऱ्या या कार्यक्रमात जेष्ठ गायक रवींद्र साठे,विनायक जोशीडॉ मृदुला दाढे- जोशी व डीडींची कन्या डॉ. अपर्णा मयेकर हिंदी व मराठी गाणी सादर करणार आहेत. या कार्यक्रमाचे संगीत संयोजन अजय मदन यांचे आहे.
डीडी केवळ संगीतकार म्हणून नव्हे तर संगीतसाहाय्यक व ऍरेंजर म्हणूनही ख्यातप्रीत होते.
बुजुर्ग संगीतकार सी. रामचंद्ररोशनचित्रगुप्त यांच्याकडे त्यांनी अनेक वर्ष काम केले. या संबंधीच्या आठवणी त्यांची कन्या डॉ. अपर्णा मयेकर जागविणार असून त्यांना बोलते करण्याचे काम निवेदिका दिपाली केळकर करणार आहेत. 'डीडीएक उत्कृष्ट वादक व तंत्रज्ञ (Technician) म्हणूनही सुप्रसिद्ध होते. विशेषतः इलेक्ट्रॉनिक वाद्यांच्या क्षेत्रात त्यांचे योगदान अमूल्य होते.
गाण्यांच्या सादरीकरणासोबत विवेक पुणतांबेकर ऑडिओ व्हिसुअल्सद्वारे 'डीडीच्या संगीतातील वैशिष्ट्ये सादर करणार आहेत.
ह्या सोहळ्याचे अजून एक वैशिष्टय म्हणजे 'डीडीयांची कामगिरी व आठवणी यावर आधारित एक पुस्तक 'अनघा प्रकाशन'तर्फे प्रकाशित होणार आहे. या पुस्तकाच्या संपादनाची जबाबदारी स्वर्गीय पत्रकार – नाट्यसमीक्षक रमेश उदारे व प्रा. कृष्णकुमार गावंड  यांनी सांभाळी आहे. या पुस्तकात जेष्ठ संगीतकार अशोक पत्कीमधू पोतदारप्रवीण दवणे अश्या अनेक नामवंत व्यक्तिंचे लेख आहेत. डीडी यांच्या कुटुंबातील सर्व वयोगटातील व्यक्तिंचा या लेखनात सहभाग आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे संगीतकार आनंद मिलिंद उपस्थित राहणार आहेत.

Subscribe to receive free email updates: