सुमेधच्या "बकेट लिस्ट" मध्ये नवा चित्रपट

               'व्हेंटिलेटर' आणि 'मांजा' या दोन सुपरहिट चित्रपटानंतर सुमेध मुद्गलकर पुन्हा एकदा चाहत्यांच्या बकेट लिस्ट मधील इच्छा पूर्ण करण्यासाठी सज्ज झाला आहे. २०१७ मध्ये आपल्या अभिनयाच्या कारकिर्दी मधून सुमेध नेहमीच चर्चेत होता. झी टॉकीज प्रस्तुत "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?" आणि "रेडिओ सिटी सिने अवॉर्ड्स" या दोन्ही पुरस्कार सोहळ्यामध्ये सुमेधने वेगवेगळ्या कॅटेगरी मध्ये त्याने नामांकन पटकावली. तसेच या आधी 'डान्स महाराष्ट्र डान्स','डान्स इंडिया डान्स सिझन ४', 'दिल दोस्ती डान्स' आणि सम्राट अशोका यांसारख्या मालिका आणि रिअॅलिटी शो मधून अभिनेता सुमेध मुद्गलकर हा घराघरात पोहोचला. 
             प्रत्येक वेळीस एखादी वेगळी भूमिका करण्याचा प्रयत्न अभिनेता सुमेध मुद्गलकर करत असतो. त्याच्या याच अनोख्या अंदाजामुळे हा नवोदित आणि तरुण अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे तो म्हणजे माधुरी दीक्षित - नेने स्टारर "बकेट लिस्ट " ह्या चित्रपटामुळे.  काही महिनांपुर्वी सुमेधने माधुरी दीक्षित सोबतच फोटो सोशल मीडिया वर अपलोड केला होता त्यामुळे सुमेध आता कोणत्या नवीन भूमिकेमध्ये असणार या साठी त्याचा चाहता वर्ग वाट बघतोय.

Subscribe to receive free email updates: