“आपला मानूस”च्या निमित्ताने नाना पाटेकरांची “आज काय स्पेशल” कार्यक्रमामध्ये हजेरी... प्रशांत दामलेंसोबत रंगली गप्पांची मैफल !

मुंबई ३० जानेवारी२०१८ : वायाकॉम18 मोशन पिक्चर्स व अजय देवगण प्रस्तुत आगामी आपला मानूस हा चित्रपट ९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा सिनेमा चर्चेत राहिला असून चित्रपटाच्या वेगळ्या कथानकामुळे तो २०१८ मधील प्रमुख आकर्षण ठरेल हे नक्की ! आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनातमध्ये अढळ स्थान निर्माण केलेले नाना पाटेकर यांनी आपला मानूस चित्रपटाच्या निमित्ताने कलर्स मराठीवरील “आज काय स्पेशल” कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. याच बरोबर चित्रपटातील इरावती हर्षे आणि सुमित राघवन हे देखील कार्यक्रमामध्ये लवकरच हजेरी लावणार आहेत. नाना पाटेकर यांनी सिनेमा बद्दल आणि इतर गप्पा तर मारणार आहेतच पण त्याचबरोबर हे तिघेही खमंग, चविष्ट डिश बनविताना देखील दिसणार आहेत. तेंव्हा बघायला विसरू नका आज काय स्पेशलचा “आपला मानूस” स्पेशल भागा नाना पाटेकर यांच्यासोबत ५ आणि ६ रोजी फेब्रुवारी दुपारी १.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर.  
नाना पाटेकर उत्तम, चविष्ट जेवण बनवतात असे आपला मानूसच्या टीमने सांगितले. नाना सेटवर देखील अनेक प्रकारचे पदार्थ घेऊन येत असतं असे त्यांच्या सहकलाकारांनी सांगितले. आज काय स्पेशलच्या विशेष भागामध्ये नाना पाटेकरांच्या हातचे चविष्ठ, रुचकर मटण आणि अळूचं फदफद प्रेक्षकांना शिकायला मिळणार आहे. या कार्यक्रमामध्ये नानांनी त्यांची आवडती डिश बनवली असून त्यांनी प्रशांत दामलेंशी दिलखुलास गप्पा देखील मारल्या. आपला मानूस चित्रपटाच्या चित्रकरणा दरम्यानच्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या. तसेच चित्रपट ते कसा निवडतात हे देखील सांगितले. अश्याच गप्पागोष्टीनी रंगलेल्या या भागामध्ये त्यांनी “आज काय स्पेशल” हा कार्यक्रम त्यांना खुप आवडतो आणि विशेष म्हणजे प्रशांत दामले ज्याप्रकारे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतात ते जास्त आवडते आणि त्यामुळे हा कार्यक्रम मी आवर्जून बघत असल्याचे त्यांनी कार्यक्रमामध्ये सांगितले. 
अश्याच आणि अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका आज काय स्पेशलचा “आपला मानूस” स्पेशल भागा नाना पाटेकर यांच्यासोबत ५ आणि ६ रोजी फेब्रुवारी दुपारी १.३० वाजता फक्त कलर्स मराठीवर. 

Subscribe to receive free email updates: