‘गजर कीर्तनाचा’ रामनवमी विशेष

‘गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा’ या नाविन्यपूर्ण कार्यक्रमाने दिवसाची सुरुवात आध्यात्मिक व मंगलमय करण्याच्या झी टॅाकीजच्या हटके प्रयत्नाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. श्री रामनवमी निमित्त कीर्तनकार श्री उद्धव महाराज मंडलिक यांनी केलेले विशेष निरुपण झी टॅाकीजवर सोमवार ३ एप्रिल ते रविवार  ९ एप्रिल दरम्यान प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.
रामायणाचा अर्थ उलगडून दाखवणारे आणि रामरक्षेचा महिमा स्पष्ट करणारे हे विशेष निरुपण असणार आहे.  निरुपणाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाबरोबरच रामनामाचा महिमा समाजाला समजावाहा या मागचा मूळ उद्देश आहे. ३ एप्रिल ते ९ एप्रिल दरम्यान रंगणाऱ्या या कीर्तनाचा आस्वाद दररोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प्रेक्षकांना घेता येईल. दीप्ती भागवत यांचं मधुर निवेदन, श्री उद्धव महाराज मंडलिक यांच्या ओघवत्या शैलीतील किर्तनाचा आस्वाद दररोज सकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत प्रेक्षकांना घेता येईल. रामनामाच्या जपाने कामक्रोधाचा लवलेश राहत नाही,असे दाखले आपल्याला संतसाहित्यात मिळतात. रामनवमीचे औचित्य साधत रंगणारा हा विशेष भाग निश्चितच आध्यात्मिक अनुभूती देणारा ठरेल. 

Subscribe to receive free email updates: