नगरसेवक चित्रपटाचा शानदार प्रिमिअर

राज्यभरातील १०० हून अधिक चित्रपटगृहांत नुकत्याच प्रदर्शित झालेल्यानगरसेवक सिनेमाचा शानदार प्रिमिअर नुकताच मुंबईत मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांना यावेळी सन्मानित करण्यात आलं. नगरसेवक चित्रपटाला शुभेच्छा देत चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं कौतुक उपस्थित मान्यवरांनी यावेळी केलं.
समाजकारण हे राजकारणाचं मुळ असायला हवं. मात्र सध्या सत्ताकारण हेच राजकारणाचं मुळ असतं असं दिसतंय समाजातील विघातक प्रवृत्ती आणि राजकारणी यांच्यातील साटेलोटे आपल्या समाजासाठी आणि देशासाठी किती घातक होऊ शकते हे दर्शविण्याचा प्रयत्न नगरसेवक मधून केला गेला आहे.
उपेंद्र लिमये, नेहा पेंडसे, सयाजी शिंदे, गणेश यादव, सुनील तावडे, संजय खापरे, विजय निकम, श्याम ठोंबरे, सविता मालपेकर, त्रियोग मंत्री, प्रियांका नागरे, अभिजीत कुलकर्णी, अशोक पावडे, यश कदम, वर्षा दांदळे, मयुरी देशमुख या मातब्बर कलाकारांच्या भूमिका ‘नगरसेवक’ चित्रपटात आहेत.

Subscribe to receive free email updates: